
Pune News: सध्या तुरीचे भाव हमीभावापेक्षा कमी झाले आहेत. त्यामुळे सरकारने १३ फेब्रुवारीपासून तुरीची हमीभावाने खरेदी सुरु केली. राज्यात ३१५ खरेदी केंद्रांना तूर खरेदीची मंजुरी दिली आहे. तूर खरेदी ९० दिवस होणार आहे. केंद्र सरकारने १०० टक्के खरेदीला परवानगी दिली असली तरी राज्य सरकारने पहिल्या टप्प्यात एकूण उत्पादनाच्या २५ टक्के तूर खरेदीला परवानगी दिली.
तुरीचा बाजार हमीभावाच्या खाली आला आहे. तुरीला सध्या ६ हजार ८०० ते ७ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान सरासरी भाव मिळत आहे. तर सरकारने यंदा तुरीला प्रतिक्विंटल ७ हजार ५५० रुपये हमीभाव जाहीर केला. म्हणजेच खुल्या बाजारात सध्या बाजारभाव कमी झाले आहेत. आता कुठे बाजारात तुरीचा नवा माल दाखल होत आहे. तूर आवकेचा दबाव पुढील दोन आठवड्यापासून आणखी वाढेल. त्यावेळी दरावरही दबाव येऊन सरासरी दर ७ हजारांवर येऊ शकतात, असा अंदाज व्यापारी आणि अभ्यासक व्यक्त करत आहेत.
बाजारभाव कमी झालेल्या परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने हमीभावाने तूर खरेदी जाहीर केली. राज्यात १३ फेब्रुवारीपासून तूर खरेदीला प्रत्यक्ष परवानगी देण्यात आली. १३ फेब्रुवारीपासून पुढचे ९० दिवस तूर खरेदी चालणार आहे. राज्य सरकारने २ लाख ९७ हजार टन तूर हमीभावाने खरेदी करण्याला परवानगी दिली आहे. तर एकूण ९ राज्यांनी १३ लाख २२ हजार टन खरेदीचे उद्दीष्ट ठेवले. केंद्राने पीएम आशामधून १०० टक्के खरेदी करण्यासाठी राज्यांना परवानगी दिली. मात्र राज्यांनी २५ टक्क्यांच्या मर्यादेत उद्दीष्ट जाहीर केले.
देशातील बाजारात तुरीची आवक सुरु झाली तसा बाजारभावही कमी होत गेला. कर्नाटक आणि महाराष्ट्रातील अनेक बाजारात तुरीची आवक सुरु झाली. पुढच्या दोन आठवड्यांत आवकेचा दबाव आणखी वाढणार आहे. पण नव्या मालाची आवक सुरु झाल्यानंतर तुरीच्या दरातही घट होत गेली. जानेवारी महिन्यात तुरीचा सरासरी भाव ७ हजार ३०० ते ८ हजारांच्या दरम्यान होता. मात्र फेब्रुवारी महिन्यातील वाढत्या आवकेबरोबर बाजारात घसरण होत गेली. तुरीचा बाजार आता हमीभावाच्या खाली आला.
बाजारभाव कमी झाले तरी हमीभावाचा एक आधार हमीभावाला आहे. खुल्या बाजारात तुरीचा बाजार कमी झाला तरी शेतकऱ्यांना हमीभावाचा पर्याय आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना या परिस्थितीत तूर विकायची आहे, त्या शेतकऱ्यांनी हमीभावाच्या खाली विक्री करण्याचे टाळावे, असे आवाहन तूर बाजारातील अभ्यासकांनी केले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.