Gold Rate : सोन्याच्या दरात एक हजारांची घसरण

गेल्या सात दिवसांत सोन्याच्या दरात एक हजारांची घट तर चांदीच्या दरात तब्बल साडेचार हजारांची घट झाली आहे.
Gold Rate
Gold RateAgrowon

जळगाव : सराफ बाजारात सोमवारी (ता. २२) सोने, चांदीच्या दरात (Gold Silver Rate) मोठी घट झाली. यामुळे गुंतवणूकदारांना (Investors) चांगली संधी उपलब्ध झाली आहे. गेल्या सात दिवसांत सोन्याच्या दरात (Gold Rate) एक हजारांची घट तर चांदीच्या दरात तब्बल साडेचार हजारांची घट झाली आहे.

सध्या लग्नसराई, बारसे यांसारखे व इतरही कार्यक्रमांचे मुहूर्त नाहीत. सोने-चांदीच्या दरात महिन्यापूर्वी चांदी ५६ हजारांपर्यंत खाली घसरली होती. यामुळे गुंतवणुकदारांनी सोने, चांदीची मोठ्या प्रमाणात खरेदी केली होती. नंतर दर पुन्हा वाढून चांदी प्रतिकिलो ६१ हजारांपर्यंत गेली होती. सोन्याचे दरही तेजीत होते. आता मात्र मागणी नसल्याने, सोबतच गुरुपुष्यामृत योग अवघ्या तीन दिवसांवर आल्याने चांदीच्या दरात किलोमागे साडेचार हजारांची घट झाली आहे. सोन्याचे दर १५ ऑगस्टला ५३ हजारांपर्यंत गेले होते.

Gold Rate
Gold Import Duty Hike: आयातशुल्क वाढवल्याने सोने महागणार

ते सध्या ५२ हजार रुपये तोळ्याप्रमाणे उपलब्ध आहे. रशिया व युक्रेनमधील युद्धामुळे सोने, चांदीच्या दरात सातत्याने ८ मार्चपर्यंत वाढ होत गेली. नंतर मात्र युद्धात शिथिलता येताच सोने, चांदीच्या दरात घसरण सुरू झाली आहे. मार्चमध्ये सोन्याच्या दरात २७०० ची तर चांदीच्या दरात २ हजारांची घसरण झाली होती. युद्ध सुरू झाल्यापासून सोन्याच्या दरात तीन ते चार हजारांची वाढ झाली होती. चांदीच्या दरात नऊ हजारांची वाढ झाली होती. याचा फायदा अनेक गुंतवणूकदारांनी घेतला.

Gold Rate
Gold Rate : गुरू पुष्पामृताच्या मुहूर्तावर चांदीत एक हजारांची घट

अक्षय तृतीयेच्या मुहूर्ताअगोदर चांदीचा दर ६९ हजारांवर (प्रतिकिलो) गेला होता; मात्र नंतर थेट चार हजारांची घसरण होऊन चांदी ६५ हजारांपर्यंत आली होती. तर सोन्याच्या दरात एका तोळ्यामागे ३५० रुपयांची घसरण झाली होती. १४ मेस सोन्याचा दर ५० हजार ६०० प्रतितोळा होते. चांदी ६१ हजारांवर होती.

२३ मेस सोन्याचा दरात ९०० रुपयांची वाढ होऊन ते ५१ हजार ५०० रुपयांवर गेले. तर चांदीच्या दरात तीन हजारांची वाढ होऊन ६४ हजारांवर गेली. तीस मेस सोने ५१ हजार ७०० तर चांदी ६३ हजारांवर गेली. अकरा जूनला सोने ५२ हजार तर चांदी दर ६३ हजार ५०० रुपये होते. २२ जूनला सोन्याचे दर ५१ हजार तर चांदी दर ६२ हजार ५०० होते. सोमवारी तब्बल एक महिन्याने सोन्याचे दर ५२ हजार तर चांदीचे दर ५६ हजार ५०० वर आले आहेत.

तारीख--सोने (प्रतितोळे)--चांदी (प्रतिकिलो)

१६ जून--५१ हजार २००--६४ हजार

२१ जून--५१ हजार ३००--६३ हजार ५००

२२ जून--५१ हजार--६२ हजार ५००

१५ ऑगस्ट--५३ हजार--६१ हजार

१६ ऑगस्ट--५२ हजार ५००--६० हजार

२२ ऑगस्ट--५२ हजार--५६ हजार ५००

सोने, चांदीच्या दरावर आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम होतो. यामुळे दरात चढउतार होतात. आजचे दर हे आंतरराष्ट्रीय घडामोडीमुळे कमी झाले असावेत. गुंतवणूकदारांना ही चांगली संधी आहे.

- मनोहर पाटील, व्यवस्थापक, आर. सी. बाफना ज्वेलर्स, जळगाव

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com