Gold Rate : गुरू पुष्पामृताच्या मुहूर्तावर चांदीत एक हजारांची घट

येत्या गुरुवारी (ता. ३०) गुरुपुष्पामृत योग आहे. या दिवशी सोने, चांदी खरेदी शुभ मानली जाते. या पार्श्वभूमीवर चांदीच्या दरात एक हजाराची घट झाली आहे.
Gold Rate
Gold RateAgrowon
Published on
Updated on

जळगाव ः येत्या गुरुवारी (ता. ३०) गुरुपुष्पामृत योग आहे. या दिवशी सोने, चांदी खरेदी (Gold Buying) शुभ मानली जाते. या पार्श्वभूमीवर चांदीच्या दरात (Silver Rate) एक हजाराची घट झाली आहे. तर सोन्याच्या दरात तीनशे रुपयांची वाढ झाली आहे. ग्राहक, गुंतवणूकदार या मुहूर्तावर अधिक सोने चांदीची खरेदी करतात, यामुळे या दरात आणखी घट होईल, असा अंदाज सराफ व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे. (Gold Rate Maharashtra)

Gold Rate
पुणे जिल्ह्यात खरिपाच्या अवघ्या सात टक्के पेरण्या

मे महिन्यात चांदीचा दर ६९ हजार (प्रतिकिलो) गेला होता मात्र; नंतर थेट चार हजारांची घसरण होऊन चांदी ६५ हजारांपर्यंत खाली आली होती. सोन्याच्या दरात एका तोळ्यामागे ३५० रुपयांची घसरण झाली होती. १४ मेस सोन्याचा दर ५० हजार ६००, चांदी ६१ हजारांवर होती. २३ मेस सोन्याचा दरात ९०० रुपयांची वाढ होऊन ते ५१ हजार ५०० वर गेले. तर चांदीच्या दरात तीन हजारांची वाढ होऊन ६४ हजारांवर गेली. तीस मेस सोने ५१ हजार ७०० तर चांदी ६३ हजारांवर गेली. अकरा जूनला सोने ५२ हजार तर चांदी ६३ हजार ५०० एवढे होती. सोमवारी (ता. २७) सोन्याचा दर ५१ हजार २०० प्रतितोळा, तर चांदीचा दर ६२ हजार ५०० (किलो) असा आहे. राज्यातील राजकारणाचाही फटका सुवर्ण बाजाराला बसण्याची शक्यता आहे. राज्यातील सत्तेचे राजकारण असेच सुरू राहिल्यास सोने, चांदीचे दर कमी होऊ शकतात, असे सराफ व्यावसायिक सांगतात.

सोने, चांदीचे दर असे (जीएसटीविना)

तारीख--सोने (प्रतितोळे)--चांदी (प्रतिकिलो)

२१ जून--५१ हजार ३००--६३ हजार ५००

२२ जून--५१ हजार--६२ हजार ५००

२३ जून--५१ हजार--६२ हजार ५००

२४ जून--५० हजार ९००--६१ हजार ५००

२७ जून--५१ हजार २००--६२ हजार ५००

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com