Gold Rate
Gold RateAgrowon

Gold Rate : सोने दरात एका दिवसात चारशे रुपयांची वाढ

सोन्याच्या दरात एका दिवसात चारशे रुपयांची वाढ झाली तर चांदीच्या दरात एक हजारांची वाढ (विना जीएसटी) झाली आहे. गेल्या गुरुवारी सोन्याच्या दराने प्रतितोळा ५६ हजारांचा (जीएसटीसह) आकडा पार होता.
Published on

जळगाव : सोन्याच्या दरात (Gold Rate) एका दिवसात चारशे रुपयांची वाढ झाली तर चांदीच्या दरात (Silver Rate) एक हजारांची वाढ (विना जीएसटी) झाली आहे. गेल्या गुरुवारी सोन्याच्या दराने प्रतितोळा ५६ हजारांचा (जीएसटीसह) आकडा पार होता. चांदीचे दरही गुरुवारी (ता. २३) ७० हजारांच्या जवळपास पोचले होते.

Gold Rate
Gold Rate : सोन्याचा दर ५५ हजारांवर

गेल्या दोन महिन्यांपासून सोने- चांदीच्या दरात प्रचंड चढउतार सुरू आहे. महिनाभरापासून तर हे दर सातत्याने वाढत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील आर्थिक उलाढाली त्याला कारणीभूत असल्या तरी भारतात साधारणतः लग्नसराईच्या हंगामात सोने-चांदीच्या दरात वाढ होते, असे मानले जाते.

शनिवारी (ता. २४) सोन्याचे दर ५४ हजार प्रती तोळा तर चांदीचे दर ६७ हजार (विना जीएसटी) होते. रविवारी (ता. २५) सोन्याच्या दरात ४०० ची वाढ होऊन ते दर ५४ हजार ४०० वर पोचले. चांदी ६७ हजार (प्रती किलो) वरून ६८ हजारांवर पोचली आहे. सोन्या चांदीतील चढउताराने गुंतवणुकदारही चक्रावले आहे. सोन्या, चांदीच्या दरात केव्हा घट होते याची ते वाट पाहत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com