Mango Pulp : हापूस पल्पला अमेरिकेत चार डॉलर अधिक दर

Mango Season : हापूस आंब्याच्या प्रक्रिया पदार्थांचा दर्जा राखला तर त्याला देशीच नव्हे, तर परदेशी बाजारातही दर अधिक मिळतो.
Mango
Mango Agrowon
Published on: 
Updated on: 

Ratnagiri News : हापूस आंब्याच्या प्रक्रिया पदार्थांचा दर्जा राखला तर त्याला देशीच नव्हे, तर परदेशी बाजारातही दर अधिक मिळतो. अमेरिकेमध्ये यंदा हापूस आंब्याला तुलनेत दुप्पट मागणी होती. आंबा पल्पलाही मागणी वाढत असून दरही चार डॉलरने अधिक मिळत आहे. याला प्रक्रिया उद्योजक आनंद देसाई यांनीही दुजोरा दिला आहे.

देसाई म्हणाले, ‘‘वातावरणातील बदलांमुळे हापूसचे उत्पादन यंदा तुलनेत अत्यंत कमी होते. त्यामुळे पुरेसा हापूस आंबा खवय्यांना खायला मिळालेला नाही; परंतु शेवटच्या टप्प्यात उत्पादन मिळाले. आवक कमी असल्यामुळे हापूसचे दरही अधिक होते. यंदा उशिरा दाखल झालेला मॉन्सून शेवटच्या टप्प्यात आंबा बागायतदारांच्या पथ्यावर पडला. झाडांवरील आंबा काढण्यासाठी पुरेसा कालावधी मिळाल्याने प्रक्रियेसाठी तो उपलब्ध झाला.

Mango
Raw Mango Market : लोणच्याच्या कैऱ्यांची आवक वाढली

बाजारातही दर स्थिर राहिल्यामुळे त्याचा फायदा उठवता आला. परजिल्ह्यांतील खवय्यांना पाहिजे तेवढा आंबा खायला मिळालेला नसल्यामुळे पल्पचे दर वाढूनही मागणी कमी झाली नाही. यंदा अमेरिकेत हापूसची अधिक निर्यात झाली. त्याप्रमाणेच हापूसच्या पल्पलाही मोठी मागणी आहे.

दर्जेदार पल्पला अमेरिकेत ८५० ग्रॅमच्या डब्याला ५.९९ डॉलर दर मिळत होता. या वर्षी हाच दर ९.९९ डॉलर मिळाला आहे. चार डॉलर अधिक दर मिळत असून, भारतीय रुपयानुसार ३२८ रुपये अधिक मिळाले आहेत.’’

पाऊस लांबला, पल्पची मागणी वाढली

जून महिना पूर्णतः उन्हाचा गेला. त्यामुळे नागरिकांकडून थंड पेयांची मागणी वाढलेली होती. जूनमध्ये विवाहांचे मुहूर्त अधिक असल्यामुळे यामध्ये जेवणात पल्पचा वापर अधिक झाला. त्याबरोबरच आइस्क्रीम, ज्यूस यासाठी आंबा पल्पचा वापर अधिक झाला होता. त्यामुळे दर वधारूनही जूनमध्ये अधिक पल्प विक्री झाल्याचे देसाई म्हणाले.

Mango
Desi Mango : गावरान आंब्यांचा हंगाम अखेरच्या टप्प्यात

भारतात ७० रुपये अधिक दर

हंगामात सुरुवातीला कॅनिंगला आंबा नव्हता. एप्रिलमध्ये डागी आंबा कॅनिंगला मिळू लागला. किलोचा दर ७० ते ८० रुपये किलो मिळाला. हा दर शेवटपर्यंत टिकून होता. मे महिन्यात दर किलोला ५० रुपयांपर्यंत होता. तो पुन्हा ६५ ते ७० रुपये वधारला.

यंदा कॅनिंगचा सरासरी दर ६० ते ६२ रुपये मिळाला. दरवर्षी तो सरासरी ३५ रुपये असतो. वाढीव दरामुळे उत्पादन खर्चात वाढ झाल्याने पल्पसह आंब्यावरील प्रक्रिया पदार्थांच्या दरात वाढ झाली आहे. तीन किलोच्या डब्याचा दर साडेआठशे रुपये आहे. पूर्वी हा डबा साडेसहाशे रुपयांना होता.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com