Flower Market : लग्नसराईत फुलबाजार वधारला

सध्या लग्नसराई सुरू झालेली आहे. त्यामुळे बाजारात लगबग पाहायला मिळत आहे. अशातच बाजारात गजरे, विविध प्रकारच्या फुलांची आवक वाढली असून मागणीप्रमाणे फुलांचा पुरवठा होत असल्याने किमती स्थिर आहेत.
Flower Market
Flower MarketAgrowon
Published on
Updated on

घणसोली, जि. ठाणे ः सध्या लग्नसराई (Wedding Season) सुरू झालेली आहे. त्यामुळे बाजारात (Flower Market) लगबग पाहायला मिळत आहे. अशातच बाजारात गजरे, विविध प्रकारच्या फुलांची आवक वाढली असून मागणीप्रमाणे फुलांचा पुरवठा होत असल्याने किमती स्थिर आहेत. त्यामुळे लग्नसराईत विविध फुलांची सजावट लक्षवेधक ठरत आहे.

Flower Market
Flower Market : फूल उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक

लग्नसराई म्हंटलं की फुलांना विशेष महत्त्व दिले जाते. अगदी लग्नाचा मांडव सजवण्यापासून प्रत्येक महिलेच्या केसात फुलांचा साज पाहायला नवरा-नवरीचा हार, त्यांची लग्नाची गाडी, करवल्यांचे गजरे, तर सत्कार करताना पाहुणे मंडळी तसेच गिफ्ट्स ऐवजी फुलांचे बुके दिले जात आहेत. त्यामुळे बाजारात सध्या मोठ्या प्रमाणात फुलांची आवक असल्याचे चित्र आहे. शिवाय यंदा शेतकऱ्यांनी फुलांची मोठ्या प्रमाणात लागवड केली असून मागणीप्रमाणे आवक असल्याने बाजारात फुलांचे दर स्थिर आहेत. त्यामुळे लग्नसराईत दोन पैसे मिळतील, अशी आशा आहे.

Flower Market
Flower Market : कोरोना निर्बंधमुक्तीनंतर बहरला फुलबाजार

अनुकूल वातावरण

यंदा परतीच्या पावसाने दिवाळीनंतरही हजेरी लावल्याने फुल उत्पादकांना त्याचा फटका बसला होता. अनेक ठिकाणी पावसामुळे उभे पीक जमीनदोस्त झाले होते. पण सध्या पडत असलेल्या थंडीमुळे फुलांसाठी अनुकूल वातावरणाची निर्मिती झाली. राज्यातील विविध भागांतून मोठ्या प्रमाणात फुलांची आवक होत असून लग्नसराईत विविध फुलांना असलेल्या मागणीमुळे शेतकऱ्यांनाही दोन पैसे मिळणार आहे. त्यामुळे बाजारात फुलांची आवक वाढली आहे.

फुलांचे प्रकार किमती (रुपयांत)

लाल, पिवळा झेंडू ३०-४० किलो

मोगरा ३५०-४५० किलो

काकडा ३००-४०० किलो

अॅस्टर ३००-४०० शेकडा

गुलाबाची जुडी (२० फुले) ६०-१००

जरबेरा फूल ५० रुपयाला एक

एक पुष्पगुच्छ २००-१००० पर्यंत

वधू-वरांचे हार ५०० ते ५००० पर्यंत

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा बाजारात फुलाला मोठी मागणी आहे. मागणी असल्याने पुरवठादेखील मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे बाजारात फुलांना भाव कमी असल्याने शेतकरी, व्यापारी हवालदिल आहे.

- किरण माशेरे, व्यापारी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com