Team Agrowon
फुलांच्या मागणीमध्ये धार्मिक विधींसाठीची फुले (लूज फ्लॉवर) आणि सजावटीची फुले (कट फ्लॉवर) असे दोन प्रकार राहतात.
दोन वर्षांत कोरोना संकटामुळे गणेशोत्सवासह धार्मिक स्थळे बंद असल्याने फुलांची मागणी घटली होती.
मात्र या वर्षी कोरोना निर्बंधमुक्तीमुळे सर्वच सण उत्साहात झाले.
शेतकऱ्यांनीही जास्त क्षेत्रावर लागवड केल्याने यंदा विविध फुलांची विविधता दिसून आली.
यंदा नेमक्या उत्सवाच्या काळात सततचा पाऊस झाला. त्यामुळे फुले भिजल्याने सर्वच सणांदरम्यान एकूण आवकेत किमान ३० ते ४० टक्के फुले भिजलेली होती.
चांगल्या दर्जाच्या फुलांना मागणी आणि दर चांगले राहिले.