Soybean Market : शेतकरी सोयाबीन विक्रीपासून वंचित

Soybean Market : सोयाबीन खरेदीसाठी दोन वेळा मुदतवाढ करण्यात आल्यानंतर ६ फेब्रुवारी रोजी सोयाबीन खरेदीची मुदत संपली.
Soybean Market
Soybean Market Agrowon
Published on
Updated on

Ahilyanagar News : सरकारी खरेदी केंद्रावर हमी दराने सोयाबीन विक्री करण्यासाठी नोंदणी करून व खरेदी केंद्राकडून सोयाबीन विक्रीबाबत संदेश येऊनही खरेदीची मुदत संपल्याने अहिल्यानगर जिल्ह्यात जिल्हा मार्केटिंग फेडरेशनअंतर्गत सुरू असलेल्या खरेदी केंद्रावर ९५२ शेतकऱ्यांना सोयाबीन विक्री करता आली नाही. दहा खरेदी केंद्रांवर आतापर्यंत १ लाख २९ हजार ७७९ क्विंटलची खरेदी झाली आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यात हमी दराने सोयाबीन खरेदी करण्यासाठी घारगाव, घुटेवाडी, राहाता, बोधेगाव, कोपरगाव, मांडवगण, पारनेर, राहुरी, पाथर्डी, जामखेड, खर्डा अशी अकरा केंद्रे सुरू करण्यात आली होती.

सोयाबीन खरेदीसाठी दोन वेळा मुदतवाढ करण्यात आल्यानंतर ६ फेब्रुवारी रोजी सोयाबीन खरेदीची मुदत संपली. मात्र अजूनही अनेक शेतकऱ्यांकडे सोयाबीन विक्रीविना पडून आहे. मुदत संपल्याने त्यांची विक्रीची अडचण झाली आहे. अनेक कारणे सांगून खरेदीदारांकडून बाजारात सोयाबीनला हमी दरापेक्षा कमी दर दिला जात आहे.

Soybean Market
Soybean Market : खरेदी न केल्यास कृषिमंत्र्यांच्या दारात सोयाबीन ओतून आंदोलन : डॉ. अजित नवले

सरकारी खरेदी केंद्रावर सोयाबीनला ४ हजार ८९२ रुपये हमीदर मिळत होता. हमी दराने सरकारी खरेदी केंद्रावर सोयाबीन विक्रीसाठी शेतकऱ्यांकडून नोंदणी करून घेतली जाते. त्यानंतर त्यांना सोयाबीन विक्रीला आणावे याबाबत संदेश दिले जातात.

Soybean Market
Soybean Market : गोदाम व्यवस्थेअभावी सोयाबीन केंद्रावर पडून ; परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील स्थिती

अहिल्यानगर जिल्ह्यात यंदा ९ हजार २१ शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी सरकारी खरेदी केंद्राकडे नोंदणी केली होती. ६ फेब्रुवारीपर्यंत त्यातील ८ हजार ६८ शेतकऱ्यांकडून १ लाख २९ हजार ७७६ क्विटंल सोयाबीनची दहा खरेदी केंद्रांवर खरेदी केली आहे.

खरेदीची मुदत संपल्याने नोंदणी करून आणि विक्रीसाठीचे संदेश येऊनही ९५२ शेतकऱ्यांना सोयाबीन विक्रीपासून वंचित रहावे लागले. सोयाबीन विक्री करता आली नसल्याने शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे.

सोयाबीन विक्रीसाठी नोंदणी केलेले वंचित शेतकरी

घारगाव (ता. श्रीगोंदा) ः ३, घुटेवाडी (ता. श्रीगोंदा) १३, राहाता ः १२५, बोधेगाव (ता. शेवगाव) ः ५४, कोपरगाव ः ६०८, मांडवगण ः १३, पारनेर ः ३१२, राहुरी ः ८७, जामखेड ः १४३.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com