
Parbhani News : परभणी ः वखार महामंडळाच्या गोदामात जागा नसल्यामुळे पणन महासंघ अंतर्गंत परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील २७ केंद्रांवर हमीभावाने खरेदी केलेले ४ लाख १७ हजार क्विंटलवर सोयाबीन पडून आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना चुकारे मिळण्यास विलंब लागत आहे.
परभणी व हिंगोली जिल्ह्यात राज्य सहकारी पणन महासंघ अंतर्गंतच्या २७ केंद्रांवर ३० हजार ८४२ शेतकऱ्यांचे ६ लाख ४७ हजार ७६९ क्विंटल सोयाबीन खरेदी करण्यात आले आहे. गुरुवार (ता. ६) खरेदी बंद झाली आहे. २ लाख ३० हजार ५३८ क्विंटल सोयाबीन वखारच्या गोदामात जमा करण्यात आले.परंतु ४ लाख १७ हजार क्विंटलवर सोयाबीन पडून आहे.त्यात परभणी जिल्ह्यातील १२ खरेदी केंद्रावर खरेदी करण्यात आलेल्या २ लाख ४७ हजार ३१०
क्विंटल पैकी ७५ हजार ९७८ क्विंटल सोयाबीन वखारच्या गोदामात जमा आले.
गोदामात जागा नसल्यामुळे १ लाख ७१ हजार ३३२ क्विंटल सोयाबीन केंद्रावर पडून आहे. हिंगोली जिल्ह्यात खरेदी केलेल्या ४ लाख ४५९ क्विंटल सोयाबीन पैकी वखार महामंडळाच्या गोदामात १ लाख ५४ हजार ५५८ क्विंटल सोयाबीन जमा करण्यात आले. जागेअभावी २ लाख ४५ हजार ९०१ क्विंटल सोयाबीन खरेदी केंद्रावर आहे. खरेदी केलेले सोयाबीन वखार महामंडळाच्या गोदामात जमा करून पावती घेतलेली पावती पणन अधिकारी कार्यालयास सादर केल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांना चुकारे अदा करण्याची प्रक्रिया पुढे सरकते.
वखारच्या गोदामात सोयाबीन साठवणूक स्थिती (क्विंटलमध्ये)
केंद्र ठिकाण खरेदी वखार साठवणूक प्रलंबित साठवणूक
परभणी १५५८३ ६०१४ ९५६९
पेडगाव २६०४० ११२८८ १४७५१
झरी ३६५८ ०० १४२६२
वरपुड ८६८० २५७ ८४२३
बोरी ३५१४७ ७८०४ २७३४३
जिंतूर ९३०३ ४१५९ ५१४४
सेलू .३४०८० १२७६० २१३२०
मानवत १२८१९ ७२३६ ५५८३
रुढीपाटी २०१८८ ५९२५ १४२६२
पाथरी २६३१७ ..३५९८ २२७१९
सोनपेठ ४१५३७ १०७९८ ३०७३९
पूर्णा १३९५५ ६१३७ ७८१८
हिंगोली ३१८३१ ७६१३ २४२१८
कन्हेरगाव २९६३२ १३६६७ १५९६५
कळमनुरी २१६८९ १०८९४ १०७९५
वारंगा १५०५३ ६५८३ ८४६९
वसमत ३२०५ १३१७८ १८९२७
जवळा बाजार २३६३३ ११६७४ ११९५८
येळेगाव २८३०९ ७५८७ २०७२२
सेनगाव ४९२१३ १५६१४ ३३५९९
साखरा १८००० ११६३३ ६३६७
शिवणी खुर्द १९१८३ ६७४२ १२४४१
फाळेगाव ३०३७५ १०२२१ २०१५४
नागसिनगी ३७१७० ११९०२ २५२६८
आडगाव ३४२११ १०७८५ २३४२५
उमरा ६४६८ २४२४ ४०४४
पुसेगाव २३५८३ १४०३६ ९५४७
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.