Banana Export : मुलानीवाडगावच्या केळीची आखात वारी

पैठण तालुक्यातील मुलानीवाडगाव येथील जायकवाडी धरणग्रस्त शेतकरी सुदामराव शिरवत यांनी ६ एकर क्षेत्रात सेंद्रिय पद्धतीने, ठिबकच्या साह्याने उत्पादित केलेल्या ४० टन केळींची थेट आखाती देशात निर्यात झाली आहे.
Banana Export
Banana ExportAgrowon

लोहगाव, ता. पैठण : तालुक्यातील मुलानीवाडगाव येथील जायकवाडी धरणग्रस्त शेतकरी सुदामराव शिरवत यांनी ६ एकर क्षेत्रात सेंद्रिय पद्धतीने (Organic Banana), ठिबकच्या साह्याने उत्पादित केलेल्या ४० टन केळींची थेट आखाती देशात निर्यात झाली आहे. (Banana Export To Gulf Country)

Banana Export
Banana : केळीला का मिळतोय विक्रमी दर?

बारा वर्षांपूर्वी दुष्काळी परिस्थितीने जायकवाडी नाथसागर प्रकल्प मृत साठ्यावर गेल्याने व विंधन विहीर, विहिरी आटल्यामुळे लोहगाव परिसरातील धरणग्रस्त गावातील केळी, मोसंबी डाळिंब, बागा नामशेष झाल्या होत्या. परंतु नंतर पाऊसमान चांगला होऊन दुष्काळी स्थिती दूर झाली. विहीर बोर, जायकवाडी प्रकल्प शंभर टक्के भरू लागल्यामुळे गेल्या तीन चार वर्षांपासून मुलानीवाडगाव, शेवता, विजयपूर, अमरापूर वाघुडी, शिवारातील काही निवडक शेतकऱ्यांनी केळीची लागवड करण्यास सुरुवात केली.

Banana Export
Banana : कुकुंबर मोझॅक विषाणूजन्य रोगाचे नियंत्रण

मुलानी वाडगाव येथील उद्यान पंडित पुरस्कारप्राप्त शेतकरी सुदामराव शिरवत यांनीही आपल्या ६ एकर क्षेत्रात १५ ऑगस्ट २०२१ ला ८ बाय ४ अंतरावर जी नाईन टिश्युकल्चर ६००० केळी रोपांची ठिबक सिंचन व पालापाचोळा, काडीकचऱ्यापासून सेंद्रिय कर्ब जमिनीत तयार करून लागवड केली होती. काटेकोर नियोजन, प्रचंड मेहनत, दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर निर्यातक्षम केळीचे उत्पादन घेतले. ही उत्पादित केळी मध्य प्रदेशातील भोपाळ येथील एका बनाना कंपनीमार्फत आखाती देशातील इराण, इराकमध्ये पाठविली गेली. या निर्यातक्षम केळीसाठी श्री. शिरवत यांना त्या कंपनीकडून २२००० रुपये प्रति टनाचा दर मिळाला. शेतकऱ्यांना श्री. शिरवत यांच्या केळीची निर्यात होत असल्याची माहिती सोमवारी (ता. २५) परिसरात मिळताच लोहगावसह परिसरातील शेतकरी जनार्दन जाधव, बाबासाहेब घुले, कुंडलीक जाधव, कल्यान जाधव, दत्तात्रय बोरुडे, नाथा भावले, नारायण गावंडे, विठ्ठल गावंडे, किशोर शिरवत, लक्ष्मण गायकवाड आदींनी बागेची व निर्यात फळांची पाहणी माहिती जाणून घेतली.

सध्या व्यापारी १६००० ते २०००० दरम्यान दर देत असल्याचे केळी उत्पादकांनी सांगितले. तर बाजारात ६० रुपये डझनला दर आहे. या शेतकऱ्यांला २२००० रुपये टनाचा भाव दिला, अशी माहिती शेतकऱ्यांना मिळाल्यावर शेतकरी बाग व केळी फळांची काढणी, पॅकिंग बघण्यासाठी आले होते.

गेल्या सात आठ वर्षांत दुष्काळ नैसर्गिक आपत्ती कोरोना संक्रमणामुळे मार्केटचा अभावामुळे केळी शेती बिकट झाली होती. परंतु या वर्षी आम्ही चांगले नियोजन केल्यामुळे निर्यात केली. केळी मालाला चांगला दर मिळाला यामुळे आम्हाला उभारी मिळाली.
सुदामराव शिरवत, केळी उत्पादक शेतकरी, मुलानी वाडगाव, ता. पैठण

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com