Banana Market : खानदेशात केळी दरात सुधारणा

Banana Rate : खानदेशात केळी दरात सुधारणा झाली आहे. दर १००० ते १५०० व सरासरी १२०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोचले आहेत.
Banana Market
Banana MarketAgrowon
Published on
Updated on

Jalgaon News : खानदेशात केळी दरात सुधारणा झाली आहे. दर १००० ते १५०० व सरासरी १२०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोचले आहेत. दरात मागील १० ते १२ दिवसांत सतत वाढ झाली असून, आवकेतही मोठी घट झाली आहे.

केळीची आवक खानदेशात सध्या २४० ट्रक (एक ट्रक १६ टन क्षमता) आहे. मे महिन्यात प्रतिदिन सरासरी ४८० ट्रक केळीची आवक होत होती. त्यात मागील १० ते १२ दिवसांत मोठी घट झाली आहे. मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथेही सध्या १३० ते १२० ट्रक केळीची आवक होत आहे.

Banana Market
Banana Crop Insurance : केळी पीकविमाधारकांना मिळणार अधिकची भरपाई

मागील हंगामात कुकुंबर मोझॅक विषाणूच्या (सीएमव्ही) भीतीने अनेकांनी एप्रिल व मे महिन्यात केळी लागवड केली होती. एप्रिल व मे महिन्यात लागवड केलेल्या केळी बागांमधील काढणी मे महिन्याच्या मध्यापर्यंत वेगात सुरू होती. केळीची आवक मोठी व मागणी कमी, अशी स्थिती होती. यामुळे एप्रिलमध्ये केळीदर ४०० ते ७०० रुपये प्रतिक्विंटल होते.

Banana Market
Banana Production : खानदेशात केळी कंदांखाली क्षेत्र अधिक

केळी दरात घसरणीमुळे जिल्हा प्रशासनाला हस्तक्षेप करावा लागला होता. व्यापाऱ्यांना तंबी द्यावी लागली होती. मे महिन्यातही केळी दरात फारशी सुधारणा झाली नाही. मेमध्ये केळीला सरासरी ८०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. परंतु या महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात केळी दरात वेगाने सुधारणा झाली. कमाल दर मध्य प्रदेशातील बाजारांत १८०० रुपयांपर्यंत पोचला आहे.

शिवार खरेदी सुरू

खानदेशात केळीची थेट किंवा शिवार खरेदी केली जाते. या खरेदीत केळीला कमाल १५०० रुपये प्रतिक्विंटलचा दर आहे. किमान दर ८०० ते ९०० रुपये प्रतिक्विंटल आहे. केळीची पाठवणूक उत्तर भारतात केली जात आहे. दिल्ली, काश्मिरात पाठवणुकीच्या केळीचे दर १५०० रुपयांपर्यंत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com