Soybean Rate : देशात १४५.५५ लाख टन सोयाबीन उपलब्धतेचा अंदाज

देशात सुमारे १२१ लाख हेक्‍टरवर सोयाबीनची लागवड होते. मध्य प्रदेश हे आघाडीचे सोयाबीन उत्पादक राज्य म्हणून ओळखले जाते. या राज्यात सुमारे ५८.५४ लाख हेक्‍टर क्षेत्रावर सोयाबीन लागवड होते.
Soybean Rate
Soybean RateAgrowon
Published on
Updated on

नागपूर ः स्टॉक लिमिट (Soybean Stock Limit) हटविल्याच्या परिणामी देशभरात सोयाबीन बाजारात (Soybean Market) तेजी अनुभवली जात आहे. अशातच सोयाबीन प्रोसेसर असोसिएशन ऑफ इंडियाने (सोपा) गेल्यावर्षीचा शिल्लक साठा (Soybean Stock) व यंदाचे उत्पादन याचा विचार करता १४५.५५ लाख टन सोयाबीन उपलब्धतेचा अंदाज वर्तविला आहे. ऑकटोबरअखेर शिल्लक साठ्याचा विचार करता हा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

Soybean Rate
Soybean Rate : सोयाबीनचे दर स्थिर

देशात सुमारे १२१ लाख हेक्‍टरवर सोयाबीनची लागवड होते. मध्य प्रदेश हे आघाडीचे सोयाबीन उत्पादक राज्य म्हणून ओळखले जाते. या राज्यात सुमारे ५८.५४ लाख हेक्‍टर क्षेत्रावर सोयाबीन लागवड होते. लागवड क्रमवारीत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर असून लागवड क्षेत्र ४३.२१ लाख हेक्‍टर आहे. राजस्थान ११ हेक्टर, कर्नाटक ३.३२, गुजरात १.४९, तेलंगणा १.६० अन्य २.०४ हेक्टर याप्रमाणे लागवड क्षेत्र आहे.

Soybean Rate
Soybean Rate : यवतमाळ जिल्ह्यात सोयाबीनसाठी आठ हमीभाव केंद्रे

देशात डिसेंबर २०२१ मध्ये सोयाबीनला सरासरी ६०९० रुपये क्‍विंटलचा दर मिळाला होता. यंदाच्या हंगामात सुरुवातीला सोयाबीनची कमी दराने खरेदी झाली. त्यानंतरच्या काळात मात्र सोयाबीनवरील स्टॉक लिमिट केंद्र सरकारकडून हटविण्यात आल्यानंतर सोयाबीनचे दर वधारले. विदर्भातील बहुतांश बाजार समित्यांमध्ये सोयाबीनने पाच हजार रुपयपर्यंतचा टप्पा गाठला आहे. यापुढील काळात त्यात आणखी वाढ होईल, अशी शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.

त्यामुळेच सोयाबीन विक्रीऐवजी ते तारण ठेवण्यावर शेतकऱ्यांनी भर दिला आहे. अशातच ‘सोपा’कडून ऑकटोबरअखेर देशातील उत्पादकतेसंदर्भात आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. ‘सोपा’च्या माहितीनुसार, शेतकरी आणि व्यापाऱ्यांकडील शिल्लक साठा १२४.०४ लाख टन आहे. शिल्लक साठा आणि यंदाचे उत्पादन मिळून देशात १४५.५५ लाख टन सोयाबीन उत्पादकतेचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. गेल्यावर्षीच्या हंगामात शिल्लक साठा अवघा १०६.४६ लाख टन होता. यावर्षी मात्र हा साठा १२४.०५ लाख टन असल्याचे सांगितले जाते. दरम्यान, शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्याने सोयाबीन विक्री करण्याचे आवाहन तज्ज्ञांकडून करण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com