Soybean Rate : सोयाबीनचे दर स्थिर

टीम ॲग्रोवन

देशात सोयाबान दर टिकून आहेत. मात्र काही बाजारांमध्ये दर क्विंटलमागे १०० रुपयाने घसरले होते.

आज देशात सोयाबीनचा सरासरी दर ५ हजार ४०० ते ५ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान होता. तर कमाल दर ६१०० रुपयांचा होता.

सोयाबीनचे दर मागील काही दिवसांपासून याच दरपातळीवर स्थिर आहेत.

तर दरवाढीच्या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन मागं ठेवलं आहे.

जागतिक सोयाबीन बाजाराची स्थिती पहता दर ५ हजार ते ६ हजार रुपयांच्या दरम्यान राहू शकतात, असा अंदाज सोयाबीन बाजार अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.

cta image | Agrowon