Turmeric Rate : वर्षभरात हळदीला मिळाले ५,८९८ ते १६,०७४ रुपये दर

Turmeric Market : हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गंत संत नामदेव हळद मार्केटमध्ये १ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२४ या आर्थिक वर्षामध्ये एकूण २ लाख ५९ हजार ७५६ क्विंटल हळदीची आवक झाली.
Turmeric
Turmeric Agrowon

Hingoli News : हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गंत संत नामदेव हळद मार्केटमध्ये १ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२४ या आर्थिक वर्षामध्ये एकूण २ लाख ५९ हजार ७५६ क्विंटल हळदीची आवक झाली. वर्षभरात हळदीला प्रतिक्विंटल किमान ५,८९८ ते कमाल १६,०७४ रुपये दर मिळाला. गत वर्षीच्या (२०२२-२३ ) तुलनेत हळदीच्या आवकेत ६५ हजार ४३३ क्विंटलने वाढ झाली आहे.

२०२३-२४ आर्थिक वर्षात एप्रिल (२०२३) महिन्यात हळदीला सर्वात कमी प्रतिक्विंटल सरासरी ५,८९८ रुपये दर मिळाला, तर मार्च (२०२४) महिन्यात सर्वाधिक प्रतिक्विंटल १६,०७४ रुपये दर मिळाला. हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संत नामदेव हळद मार्केटमध्ये हिंगोली जिल्हाभरातून तसेच शेजारील परभणी, नांदेड या जिल्ह्यांसह विदर्भातील वाशीम-यवतमाळ, अकोला, अमरावती, बुलडाणा आदी जिल्ह्यांतून हळदीची मोठ्या प्रमाणावर आवक येते.

Turmeric
Turmeric Market : हळद वगळता सर्व पिकांच्या भावात वाढ

जाहीर लिलावाद्वारे खरेदी केली जाते. सध्या शासकीय सुट्टीचे दिवस सोडून दररोज आवक घेतली जात आहे. मे महिन्यात आवकेत वाढ होऊ शकते. त्याअनुषंगाने आठवड्यातील सोमवार ते शुक्रवार हे पाच दिवस हळदीची आवक घेण्याचे नियोजन केले जात आहे. त्यामुळे लिलाव, वजनमापाची प्रक्रिया गतिमान होईल.

गत वर्षी २०२२-२०२३ मध्ये हळदीची एकूण १ लाख ९४ हजार ३२३ क्विंटल आवक झाली होती. गत वर्षी (२०२३) एप्रिल महिन्यात सर्वाधिक प्रतिक्विंटल सरासरी ७,२९० रुपये, तर ऑक्टोबर महिन्यात सर्वात कमी प्रतिक्विंटल सरासरी ६,१७४ रुपये दर मिळाले. वर्षभरात प्रतिक्विंटल सरासरी ६,५६६ रुपये दर मिळाला.

Turmeric
Turmeric Seed : हळदीच्या बेण्याची मागणी वाढली

२०२१-२२ या आर्थिक वर्षात हळदीची एकूण १ लाख ८१ हजार ४३२ क्विंटल आवक झाली होती. त्या वर्षी प्रतिक्विंटल सरासरी ७,१५९ रुपये दर मिळाले होते. २०२२ च्या जानेवारी महिन्यात सर्वाधिक म्हणजेच प्रतिक्विंटल ८,७४० रुपये सरासरी दर मिळाले होते.

संत नामदेव हळद मार्केट

२०२३-२४ मधील आवक, दर स्थिती

(आवक क्विंटलमध्ये दर रुपयांत)

महिना आवक क्विंटल सरासरी भाव

एप्रिल २३,३२० ५,८९८

मे ३७,१५० ६,३३४

जून २६,८२५ ७,०७२

जुलै ४५,१९२ १०,५९४

ऑगस्ट ३१,०८१ १४,५८८

सप्टेंबर १३,८९३ १२,५८९

ऑक्टोबर १६,३६० ११,६१३

नोव्हेंबर १०,६२५ ११,५६७

डिसेंबर १३,६५५ ११,८६५

जानेवारी १५,२०० ११,४७९

फेब्रुवारी ११,८०५ १२,९८३

मार्च १४,६५० १६,०७४

नवीन हळदीची आवक सुरू आहे. यंदा विविध कारणांमुळे उत्पादकता घटली. दरात तेजीचे संकेत आहेत. त्यामुळे पुढील वर्षी हळद लागवडीसाठी शेतकरी घरचे बेणे ठेवत आहेत. सध्या दररोज ३ हजार क्विंटल आवक होत आहे. मे महिन्यात आवकेत वाढ होऊ शकते.
नारायण पाटील, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, हिंगोली

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com