Fish Market : पर्यटन हंगामामुळे मासळीचे दर वाढले

Fish Rate : पापलेट प्रतिकिलो १ हजार ५०० तर सुरमई प्रतिकिलो १ हजार रुपयांवर गेली आहे. याशिवाय बांगडा, कोळंबी आणि सौंदळाच्या दरात देखील चांगली सुधारणा झाली आहे.
Fish Market
Fish MarketAgrowon

Sindhudurg News : जिल्ह्यात पर्यटन हंगाम सुरू होताच मासळीच्या दरात सुधारणा झाली आहे. पापलेट प्रतिकिलो १ हजार ५०० तर सुरमई प्रतिकिलो १ हजार रुपयांवर गेली आहे. याशिवाय बांगडा, कोळंबी आणि सौंदळाच्या दरात देखील चांगली सुधारणा झाली आहे.

जिल्ह्यातील देवगड, मालवण आणि वेंगुर्ला या तीन तालुक्यांना १२१ किलोमीटर लांबीची किनारपट्टी आहे. या किनारपट्टीच्या गावांमध्ये मासेमारी (Fishing) केली जाते. देवगड, विजयदुर्ग, गिर्ये, मालवण, आचरा, वेंगुर्ला बंदरात मोठ्या प्रमाणात मासेमारी करून लिलावाकरिता आणली जाते.

Fish Market
Fish Market News : हर्णे बंदरात माशांचा लिलाव सुरू

या ठिकाणी मच्छीमार लिलाव करतात. व्यापारी येथे खरेदी करून ती विक्रीसाठी विविध बाजारपेठांमध्ये पाठवितात. आतापर्यंत सुरमई (Surmai) प्रतिकिलो ७०० ते ८०० रुपये, पापलेट ८०० ते १००० रुपये, कोळंबी प्रतिकिलो ४०० रुपये असे दर होते.

दरम्यान, एप्रिलमध्ये जिल्ह्यात पर्यटन हंगाम गतीने सुरू झाला आहे. देशभरातील पर्यटक सिंधुदुर्गात पर्यटनाकरिता येतात. शाळांना सुट्टी पडल्यानंतर पर्यटकांची गर्दी समुद्रकिनारी अधिक होते.

Fish Market
Fish Market : गोड्या पाण्यातील माशांची मेजवानी

सध्या बहुतांश शाळांना सुट्टी पडली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पर्यटक जिल्ह्यात येऊ लागले आहेत. कोकणात (Konkan) येणाऱ्या पर्यटकांची मासळीला पहिली पसंती असते. त्यामुळेच मासळीच्या दरात चांगली सुधारणा झाली आहे.

पापलेट, सुरमईसह लहान कोळंबी प्रतिकिलो ४०० रुपये, टायगर कोळंबी प्रतिकिलो ६०० रुपये, सौंदळा ३५० रुपये, बांगडा २५० रुपये किलोने मिळत आहे. हे दर आता मे अखेरपर्यंत कायम राहण्याचा अंदाज आहे.

पर्यटन हंगाम सुरू झाल्यानंतर मासळीच्या दरात वाढ होते. आता दरात चांगली वाढ झाली आहे. दरवर्षी या हंगामात मासळीच्या दरात सुधारणा होते. जिल्ह्यात आलेल्या पर्यटकांकडून मासळीच्या जेवणाची मागणी अधिक असते.
- नीतेश पाटील, हॉटेल व्यावसायिक, वैभववाडी, जि. सिंधुदुर्ग.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com