Fish Market : गोड्या पाण्यातील माशांची मेजवानी

Freshwater Fishing : पावसाळा नुकताच सरला आहे. त्यामुळे नदी, तलाव, ओहळ, शेतात काही प्रमाणात पाणी आहे. या गोड्या पाण्यातील मासेमारी सध्या जोरात सुरू आहे.
Fish Market
Fish MarketAgrowon
Published on
Updated on

Pali News : पावसाळा नुकताच सरला आहे. त्यामुळे नदी, तलाव, ओहळ, शेतात काही प्रमाणात पाणी आहे. या गोड्या पाण्यातील मासेमारी सध्या जोरात सुरू आहे. यात विविध मासे मोठ्या प्रमाणात आढळत असून खवय्यांच्या उड्या त्यावर आहेत. चविष्ट गोड्या पाण्यातील मासे आणि चिंबोऱ्यांवर ताव मारत आहेत. हे मासे सध्या बाजारात उपलब्ध होत असल्याने खवय्यांना मेजवानी मिळत आहे.

नदीकिनारी, ओहळ, शेतात आणि डोंगर कपारीत सापडणाऱ्या गोड्या पाण्यातील विषेशतः काळ्या पाठीच्या चिंबोऱ्या सध्या मुबलक मिळत आहेत. पौष्टिक आणि चविष्ट अशा या चिंबोऱ्या खवय्ये चवीने खातात. तसेच नद्या, तलाव, धरण, पाणवठे, ओढे, ओहळ, शेतात साठलेले पाणी अशा गोड्या पाण्यात सापडणाऱ्या माशांची आवकही वाढली आहे.

Fish Market
Fish Specie : प्रदूषणामुळे ४८ मत्‍स्य प्रजाती नामशेष?

त्यामध्ये मळे, कोलीम, म्हूऱ्या, शिवडा, अरलय, वाम, कोळंबी, कटला, फंटूस व खवल आदी माशांचा समावेश आहे. मळे व म्हूऱ्या हा प्रकार या दिवसांत अधिक मिळतो. त्यामुळे खवय्ये आवर्जून खरेदी करतात.

काही जण तर मुंबई, ठाणे आदी शहरात राहणाऱ्या आपल्या नातेवाईकांना भेटही देतात. कोळी बांधवांबरोबरच प्रामुख्याने आदिवासी आणि गळभोई समाजातील लोक मेहनतीने हे मासे व चिंबोऱ्या पकडतात. ते विकून त्यांच्या हाती चार पैसे मिळतात.

Fish Market
Fishing Ban : चौपन मासे पकडण्यासह खरेदी-विक्रीवर निर्बंध

मासळीचे दर (रुपयांत)

मासळी प्रकार यंदाचे दर मागील वर्षी

मळे (किलो) २०० १५०

(बारीक कोळंबी) ४० ३०

म्हूऱ्या ४० ३०

शिवडा, कटला व वाम ५५० ४००

मोठी गोडी कोळंबी १२०० १०००

फंटूस ३०० २५०

पावसाळा संपल्याने मोठ्या प्रमाणात गोड्या पाण्यातील मासेमारी केली जात आहे. सध्या हे मासे मुबलक प्रमाणात मिळत आहेत. त्यामुळे उदरनिर्वाह चांगला सुरू आहे.
- जितेश दळवी, मासेमारी करणारा तरुण, टेंबी वसाहत
सध्या गोड्या पाण्यातील मासे खूप मिळत आहेत. शहरात असणाऱ्या नातेवाइकांना आवर्जून भेट म्हणून गोडे पाण्यातील मासे नेले आहेत. मळे, शिवडा, कटला व म्हूऱ्या हे मासे अनेकांना खूप आवडतात.
- प्रियांका गोसावी, गृहिणी, माणगाव

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com