Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांचे पालुपद

India Pakistan War Statement : भारत-पाकिस्तान संघर्ष माझ्यामुळेच थांबला,’’ असे पालुपद अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरूच ठेवले आहे. ‘‘भारत-पाकिस्तान यांच्यात चार दिवस सुरू असलेला आणि संभाव्य आण्विक संघर्षापर्यंत जाऊ शकणारा संघर्ष मीच थांबवला.
Donald Trump
Donald TrumpAgrowon
Published on
Updated on

New Delhi News: ‘‘भारत-पाकिस्तान संघर्ष माझ्यामुळेच थांबला,’’ असे पालुपद अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरूच ठेवले आहे. ‘‘भारत-पाकिस्तान यांच्यात चार दिवस सुरू असलेला आणि संभाव्य आण्विक संघर्षापर्यंत जाऊ शकणारा संघर्ष मीच थांबवला,’’ असे ट्रम्प यांनी पुन्हा एकदा म्हटले आहे.

शुक्रवारी व्हाइट हाउस येथे बोलताना ट्रम्प म्हणाले, ‘‘दक्षिण आशियातील शेजारी देशांमधील अलीकडील संघर्षात पाच ते सहा विमाने पाडण्यात आली.’’ अर्थात ही विमाने कोणत्या देशाची होती, त्यामुळे कोणत्या देशांचे नुकसान झाले, याबाबत कोणतेही स्पष्टीकरण ट्रम्प यांनी दिलेले नाही. यापूर्वी ट्रम्प यांनी युद्ध थांबविल्याचा दावा ३५ वेळा केला आहे.

Donald Trump
Donald Trump: ...तोपर्यंत भारताबरोबर व्यापार कराराबाबत चर्चा नाही : ट्रम्प

भारत आणि पाकिस्तानमधील संघर्ष दोन्ही देशांमधील लष्करी दलांमध्ये झालेल्या चर्चेनंतर थांबला, असे भारताने वारंवार स्पष्ट करूनही ट्रम्प आपल्यामुळेच युद्ध थांबल्याचा दावा वारंवार करीत आहेत. अमेरिकेच्या मध्यस्थीने शांतता करारावर स्वाक्षऱ्या करण्याच्या बैठकीमध्ये अझरबैजानचे अध्यक्ष इल्हाम अलीयेव आणि अर्मेनियाचे पंतप्रधान निकोल पशिनियन यांच्या शेजारी बसून ट्रम्प यांनी हा दावा नव्याने केला आहे.

‘‘अमेरिकेचा अध्यक्ष म्हणून जगात शांतता आणि स्थिरता प्रस्थापित करणे ही माझी सर्वोच्च महत्त्वाकांक्षा आहे. आजचा करार भारत आणि पाकिस्तानसोबतचा संघर्ष थांबविण्यात अमेरिकेला आलेल्या यशानंतर झाला आहे. संभाव्य अण्वस्त्र संघर्ष होण्याआधीच ते दोन्ही देश एकत्र आले होते,’’ असे ट्रम्प म्हणाले.

Donald Trump
Trump India Tariff : डोनाल्ड ट्रम्प यांचे आयात कर अस्त्र

ट्रम्प म्हणाले, ‘‘मी भारत आणि पाकिस्तानमधील संघर्ष थांबवला. माझ्या मते, यामागे इतर कोणत्याही कारणापेक्षा व्यापाराचे कारण अधिक होते. मला अशा देशांशी व्यवहार करायचा नाही जे स्वतःचे आणि जगाचेही नुकसान घडवण्याचा प्रयत्न करीत आहेत.’’

ट्रम्प-पुतीन भेट

वॉशिंग्टन : युक्रेनसोबत सुरू असलेला संघर्ष थांबविण्यासाठी पुढील शुक्रवारी अलास्का येथे रशियाचे अध्यक्ष व्लादीमिर पुतीन यांची भेट घेणार आहे, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. ट्रम्प यांनी सोशल मीडियावरून ही घोषणा केली आहे. मात्र रशियाकडून अद्याप या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. पुतीन-ट्रम्प यांच्यामधील बैठक निर्णायक ठरू शकते, असे आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांनी म्हटले आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये युद्ध थांबविण्याच्या अटींबाबत अद्याप एकमत होऊ शकलेले नाही. यापूर्वी दोन्ही देशांच्या चर्चेतून कोणताही तोडगा निघालेला नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com