Rice : आता तांदूळही महाग होणार?

भारत तांदळाचा चीननंतर दुसरा महत्वाचा देश आहे. खरीप हंगाम भात लागवडीसाठी महत्वाचा असतो. पण यंदा उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगाल राज्यात पाऊस कमी झाला. परिणामी देशातील भात लागवडच कमी झाली.
Rice Export
Rice ExportAgrowon
Published on
Updated on

पुणेः देशात भात लागवड (Paddy Cultivation In India) १३ टक्क्यांनी कमी आहे. परिणामी तांदूळ उत्पादनात (Rice Production) मागीलवर्षीच्या तुलनेत १०० लाख टनाने घट होऊ शकते, असा अंदाज व्यक्त होतोय. त्यातच देशातून तांदूळ निर्यात (Rice Export) जोमाने सुरु आहे. यंदा तर विक्रमी तांदूळ निर्यात होईल, असा अंदाज आहे.

भारत तांदळाचा चीननंतर दुसरा महत्वाचा देश आहे. खरीप हंगाम भात लागवडीसाठी महत्वाचा असतो. पण यंदा उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगाल राज्यात पाऊस कमी झाला. परिणामी देशातील भात लागवडच कमी झाली. २९ जुलैपर्यंत भात लागवड १३.३ टक्क्यांनी कमी राहिली. देशात खरिपात भाताची सरासरी ३९७ लाख हेक्टरवर लागवड होते. आत्तापर्यंतत २३१ लाख हेक्टरवर भात लागवड झाली. मात्र मागीलवर्षी याच काळात २६७ लाख हेक्टर क्षेत्र भाताखाली होतं.

देशातील कमी पावसाचा फटका सर्वच पिकांच्या पेरणीला बसतोय. उत्तर प्रदेशातील पूर्व भागात जून आणि जुलै महिन्यात सरासरीपेक्षा ५३ टक्के कमी पाऊस झाला. तर पश्चिम उत्तर प्रदेशात ५० टक्क कमी पाऊस आहे. बिहारमध्येही सरासरीपेक्षा ४२ टक्के कमी पाऊस झाला. झारखंडमध्येही पावसाचं प्रमाण केवळ ५० टक्के आहे. पश्चिम बंगालमध्येही पावसातील तूट ४६ टक्क्यांवर पोचली.

Rice Export
GM Rice-भारतात जीएम भात नाहीः कृषिमंत्री तोमर

पाऊस कमी असल्यानं या राज्यांमध्ये खरीप भात लागवडीही कमी झाल्या. पश्चमि बंगालमध्ये आत्तापर्यंत मागीलवर्षीपेक्षा १० लाख ६० हजार हेक्टरने लागवड कमी झाली. तर उत्तर प्रदेशात 7 लाख हेक्टरने क्षेत्र कमी आहे. तसंच झारखंड आणि बिहारमध्ये ५ लाख हेक्टरने लागवड घटली. तेलंगणामध्येही ४ लाख टनाने भात लागवडीखालील क्षेत्र घटलं.

Rice Export
Rice: लवकरच येणार भाताचे दुष्काळप्रतिबंधक वाण

मागील हंगामात देशात जवळपास १३०० लाख टन तांदूळ उत्पादन झाल्याचा सरकारचा अंदाज आहे. खरिपात भात लागवड कमी झाल्याचा बाजारावरही परिणाम होत असल्याचं जाणकारांचं मत आहे. व्यापारी आणि बाजारातील इतर घटक तांदूळ उत्पादनात १०० लाख टनांची घट पकडूनच व्यवहार करत आहेत, असं सूत्रांनी सांगितलं. देशातील विविध व्यापारी केंद्रांवर तांदळाचे दर ८ ते १६ टक्क्यांनी वाढले आहेत.

देशात यंदा भाताचं उत्पादन घटण्याचा अंदाज व्यक्त होतोय. त्यामुळं दरवाढ होत असल्याचंही सांगितलं जातंय. पण याही परिस्थितीत देशातील तांदळाचा साठा दिलासादायक दिसतोय. १ जुलै २०२२ रोजी सरकारकडे गरजेपेक्षा तांदळाचा साठा १३४ टक्क्यांनी अधिक होता. अन्नसुरक्षा नियमानुसार १ जुलै रोजी सरकारकडे १३५ लाख टन तांदूळ असणं गरजेचं होतं. मात्र सरकारकडं प्रत्यक्ष ३१५ लाख टन तांदूळ आहे. याव्यतिरिस्त मिलर्सकडे २३.१५ धान आहे. यापासून १५५ लाख टन तांदूळ मिळेल.

म्हणजेच खरिपात तांदळाचं उत्पादन कमी झालं तरी देशात पुरेसा साठा आहे. मात्र दुसरीकडं भारतातून निर्यात सुरु आहे. भारत जगातील आघाडीवरचा तांदूळ निर्यातदार आहे. जवळपास १५० देशांना भारतातून तांदूळ जातो. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात तांदळासह सर्वच धान्याचा तुटवडा जाणवतोय. दरही वाढलेत. त्यामुळे देशातून यंदा विक्रमी तांदूळ निर्यात होईल, असा अंदाज आहे. मात्र देशातून तांदूळ निर्यात वाढल्यास दरवाढ निश्चित आहे. या परिस्थितीत निर्यातीवर निर्बंध किंवा बंदी येऊ शकते, असा अंदाजही जाणकारांनी व्यक्त केलाय.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com