Indian Poultry Industry: भारतीय प्रजातीच्या पोल्ट्री ब्रीडला अफ्रिकेतून मागणी

Global Poultry Trade: भारतीय पोल्ट्री उद्योगासाठी मोठी संधी निर्माण झाली आहे. एव्ही ब्रॉयलर कंपनीने आफ्रिकेतील सेनेगलमधील सोरा होल्डिंग्ससोबत सामंजस्य करार केला असून, यामुळे भारतीय पोल्ट्री ब्रीडच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराला चालना मिळणार आहे.
Sahyadri Farms Nashik
Sahyadri Farms NashikAgrowon
Published on
Updated on

Nashik News: जागतिक पोल्ट्री ब्रीड उत्पादनांत ‘एव्ही ब्रॉयलर’ या भारतीय कंपनीने स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. आफ्रिका खंडातील सेनेगल या देशातील सोरा होल्डिंग या कंपनीसोबत एव्ही ब्रॉयलरचा सामंजस्य करार नुकताच ‘सह्याद्री फार्म्स’ नाशिक येथे करण्यात आला. याबाबतची माहिती कंपनीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक श्रीकृष्ण गांगुर्डे यांनी शुक्रवारी (ता. २८) पत्रकार परिषदेत दिली. या वेळी सोरा होल्डिंगचे अध्यक्ष सिस्कोम माऊ, ‘अॅडफिड’चे संचालक मॅलिक सेने, डॉ. रत्नाकर पाटील, मानसी गांगुर्डे व उपाध्यक्ष डॉ. इलिमाने डायने उपस्थित होते.

Sahyadri Farms Nashik
Poultry Farming : कडक उन्हात अशी घ्या कोंबड्यांची काळजी

अमेरिकन व युरोपीयन उत्पादने व महागडे तंत्रज्ञानापेक्षा भारतीय ब्रीड व तंत्रज्ञान परवडणाऱ्या दरात मिळत असल्याने एव्ही ब्रॉयलर (भारत) व सोरा होल्डिंग्ज यांच्यात हा सामंजस्य करार करण्यात आला. याबाबत श्रीकृष्ण गांगुर्डे यांनी सांगितले, की सेनेगल देश व एकूणच आफ्रिका खंड हा ब्रॉयलर पक्षी व अंड्यांचा मोठा ग्राहक देश आहे.

या देशाला अमेरिका व युरोपीय देशांतून होणाऱ्या आयातीवर अवलंबून राहावे लागत आहे. मात्र हे अवलंबित्व खर्चिक असल्याचे सेनेगल देशातील पोल्ट्री व्यावसायिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे भारतातून येणाऱ्या पोल्ट्री ब्रीडला प्राधान्य देण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी सेनेगलमधील पोल्ट्री अनुवंश आयातदार व ग्राहकांनी एव्ही ब्रॉयलरच्या ब्रीडला पसंती दिली आहे. या संदर्भात द्विपक्षीय सामंजस्य करार झाल्याने भारतीय पोल्ट्री उत्पादनांच्या या दोन्ही देशांतील व्यापाराला चालना मिळणार आहे.

Sahyadri Farms Nashik
Poultry Industry: राज्यात मांसल कोंबडीचे दर कोसळले! पोल्ट्री व्यावसायिक अडचणीत

ब्रीड उष्णकटिबंधीय हवामान परिस्थितीत काटक, अनुकूल एव्ही ब्रॉयलर्स ही भारतीय मालकीची पहिली प्युअर-लाइन ब्रॉयलर जेनेटिक (आनुवंशिक) कंपनी आहे. या कंपनीमार्फत कोणत्याही प्रतिकूल हवामान परिस्थितीला अनुकूल असा उत्कृष्ट ब्रॉयलर आनुवंशिक पक्षी तयार करण्यावर भर दिला जातो. ग्रामीण भागात पायाभूत संसाधने आणि नवीन तंत्रज्ञानाची उपलब्धता नसते. यावर उपाय म्हणून ‘एव्ही ब्रॉयलर्स’ने ब्रॉयलर ब्रीड विकसित केले आहे. हे ब्रीड उष्णकटिबंधीय हवामान परिस्थितीत काटक, अनुकूल तसेच चांगली वाढ व वजन देणारे आहे. इतर प्रजातीच्या तुलनेत यात मांसाचे प्रमाण ३ टक्के जास्त आहे.

सातत्यापूर्ण संशोधन आणि विकास यावर भर दिला. यातून विकसित या ब्रीडने आता उझबेकिस्तान, तझेकिस्तान, नायजेरिया, केनिया, सेनेगलसारख्या देशांमध्ये ओळख निर्माण केली आहे. लवकरच मध्यपूर्व, तसेच सीरिया, लेबेनन, इराक, जॉर्डन, येमेन, तुर्की, सौदी अरेबिया, ओमान, दक्षिण अमेरिका, पेरू, कोलंबिया, चिली, जगातील अन्य देशांमध्येही विस्तार करण्याची योजना आहे.
श्रीकृष्ण गांगुर्डे, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक-एव्ही ब्रॉयलर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com