Chana Market : काबुली चणा, हिरव्या वाटाण्याच्या निर्यातीत घट

Green Peas Export : यावर्षी काबुली चणा, हिरवा वाटाण्याच्या निर्यातीत घट झाली असून देशांतर्गत मागणी वाढल्याने दरात सुधारणा झाली आहे.
Green Peas
Green PeasAgrowon
Published on
Updated on

Nagpur News : यावर्षी काबुली चणा, हिरवा वाटाण्याच्या निर्यातीत घट झाली असून देशांतर्गत मागणी वाढल्याने दरात सुधारणा झाली आहे. आता पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली असून अतिपावसाच्या तडाख्यामुळे भाज्यांची आवक घटल्याने भाजीपाल्याच्या दरातही तेजी आली आहे.

गेल्या पंधरा दिवसांपासून अवकाळी पावसामुळे शहरातील सर्व बाजारपेठांमध्ये भाज्यांची आवक घटली आहे. रविवारपासून (ता. २१) पावसाने उघडीप घेतल्याने पालेभाज्यांसह इतर भाज्यांची आवक वाढली असली, तरी पावसामुळे बराचसा माल खराब झाला आहे. त्यामुळे भाज्यांचे दर अद्याप कमी झालेले नाहीत.

Green Peas
Green Pea Sowing : पुरंदरमधील शेतकऱ्यांचा वाटाणा पिकांकडे कल

कडधान्यांना मात्र मोठी मागणी आहे. पाऊस कमी झाल्याने कडधान्याच्या उत्पादनावरही परिणाम झाला. उत्पादन कमी झाल्याने देशात काबुली चणा, उडीद, मूग या कडधान्यांचे भाव वाढले. देशातील कडधान्य उत्पादनात यंदा मोठ्या प्रमाणात घट झाल्याने भाव वाढू लागले आहेत.

Green Peas
Chana Market : अकोल्यात हरभऱ्याला प्रतिक्विंटल सहा हजारांचा दर

त्यामुळे बांगलादेश, चीन आणि यूएई या देशांनी आयात कमी केली. देशातून २०२३-२४ या आर्थिक वर्षात कडधान्याची निर्यात तब्बल २२ टक्क्यांनी कमी झाली. संपलेल्या आर्थिक वर्षात भारतातून जवळपास ६ लाख टन कडधान्य निर्यात झाली. मात्र २०२२-२३ च्या आर्थिक वर्षात ७ लाख ६२ हजार टन कडधान्य निर्यात झाली होती.

भारतातून हरभरा निर्यातही चांगली होते. पण यंदा हरभऱ्याचे भाव हमीभावापेक्षा १० ते १५ टक्क्यांनी जास्त आहेत. त्यामुळे हरभरा निर्यातीवर परिणाम झाला. परिणामी, काबुली चणा, हिरवा वाटाणा आणि मटकीच्या दरात वाढ झाली आहे.

कडधान्य दर - मे-जुलै (प्रतिकिलो)

काबुली चणा - १०५-१४० रुपये

हिरवा वटाणा - ८५-१२५ रुपये

मटकी - ८४-८९ रुपये

पावसामुळे भाज्यांची आवक कमी झाली असून दरात वाढ झाली आहे. त्यामुळे ग्राहकांकडून भाज्यांऐवजी कडधान्याला पसंती दिली जात आहे. तसेच हॉटेल संचालकांकडूनही काबुली चणा, हिरव्या वाटाण्याची मागणी वाढल्याने दरात विक्रमी वाढ झाली आहे. मटकीचे दरही वाढलेले आहेत.
- प्रभाकर देशमुख, अध्यक्ष, नागपूर किरकोळ व्यापारी संघ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com