Jowar Rate: खानदेशात दादर ज्वारीचे दर स्थिर

Jowar Market Update: खानदेशातील प्रमुख रब्बी पीक असलेल्या दादर ज्वारीचे दर यंदा स्थिर राहिले आहेत. सरासरी दर २८०० रुपये प्रति क्विंटल, असे राहिले आहेत.
Jowar
JowarAgrowon
Published on
Updated on

Jalgaon News: खानदेशातील प्रमुख रब्बी पीक असलेल्या दादर ज्वारीचे दर यंदा स्थिर राहिले आहेत. सरासरी दर २८०० रुपये प्रति क्विंटल, असे राहिले आहेत. तसेच कडबा दरही टिकून आहेत.

दादर ज्वारी खानदेशात हुकमी पीक आहे. पाऊसमान चांगले राहिल्याने कोरडवाहू दादर ज्वारीची पेरणी अपेक्षेपेक्षा अधिक झाली होती. खानदेशात यंदा सुमारे ३५ हजार हेक्टरवर दादर ज्वारी पीक होते. सर्वाधिक पेरणी जळगाव जिल्ह्यात झाली होती. दिवाळीनंतर कोरडवाहू दादर ज्वारीची पेरणी वेगात सुरू झाली.

Jowar
Summer Jowar Crop : उन्हाळी ज्वारीने शिवार बहरले

तापी, गिरणा, पांझरा, अनेर, बोरी, सुसरी आदी नद्यांच्या क्षेत्रातील काळ्या कसदार जमिनीत अधिकची पेरणी करण्यात आली. पिकास फवारणी, बियाणे, खते आदींचा कुठलाही खर्च नसल्याने दादर ज्वारीची पेरणी खानदेशात अनेक शेतकरी करतात. तसेच कसदार कडबादेखील दादर ज्वारीतून उपलब्ध होतो.

जमिनीत वाफसा चांगला किंवा टिकन राहिल्याने पीकवाढ जोमात होती. तसेच निसवणदेखील चांगली होती. मळणी फेब्रुवारी व मार्चमध्ये झाली. एकरी १० ते ११ क्विंटल एवढे उत्पादन हाती आले. तसेच काही शेतकऱ्यांनी विद्यापीठांकडून संशोधित वाणांची पेरणी केली होती. अशा शेतकऱ्यांना एकरी १४ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळाले आहे.

Jowar
Jowar Threshing : दादर ज्वारी पीक मळणी पूर्ण

सुरुवातीला दर २८०० ते ३३०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत मिळाले. जळगाव बाजार समितीत मार्चच्या मध्यापासून ते एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत प्रतिदिन सरासरी दीड हजार क्विंटल दादर ज्वारीची आवक झाली. तसेच जळगाव जिल्ह्यात अमळनेर, चोपडा, धुळ्यातील शिरपूर बाजार समितीतदेखील आवक चांगली होती. दादर ज्वारीस त्या वेळेसही उठाव होता. तसेच सध्यादेखील मागणी आहे. दादर ज्वारीची आवक बाजार समित्यांत स्थिर आहे. किमान दर २८०० व कमाल ३१०० ते ३३०० रुपये प्रति क्विंटल, असे काही दिवसांपासून आहेत.

कडबाही मुबलक

दादर ज्वारीचा कडबा यंदा बऱ्यापैकी आहे. कडबा खरेदीसाठी गुजरात, मध्य प्रदेश, नजीकच्या छत्रपती संभाजीनगर, बुलडाणा जिल्ह्यातील पशुपालकदेखील खानदेशात येत आहेत. कडब्याचे एका एकरात १७० ते १७४ पेंढ्या एवढे उत्पादन आले. त्याचे दर उंचीनुसार कमी व अधिक होते. १० ते १२ फुटांच्या कोरडवाहू क्षेत्रातील दादर ज्वारीच्या कडब्यास साडेतीन ते चार हजार रुपये प्रतिशेकडा दर आहेत. १५ ते १६ फूट उंचीच्या कडब्यास प्रति शेकडा चार हजार ते साडेचार हजार रुपये दरही मिळाला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com