Summer Jowar Crop : उन्हाळी ज्वारीने शिवार बहरले

Jowar Farming : घाटनांद्रा परिसरातील धारला, चारणेर वाडी पेंडगाव या महसूल मंडलांमध्ये गतवर्षी जून महिन्यात चांगला पाऊस पडला व खरिपाच्या पेरण्या लवकर झाल्या होत्या.
Jowar Crop
Jowar Crop Agrowon
Published on
Updated on

Chh. Sambhajinagar News : घाटनांद्रा व धारला शेतशिवारांमध्ये यावर्षी खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन पिकाची काढणी झाल्यानंतर शेतकऱ्यांनी प्रमुख अन्नधान्य पीक म्हणून यावर्षी उन्हाळी ज्वारी व बाजरीला पसंती दिली. मागील वर्षाच्या तुलनेत परिसरात यावर्षी ५ टक्क्यांनी ज्वारी व बाजरीच्या पेरणीत वाढ झाली. मार्च महिन्यात बाजरीच्या व ज्वारीच्या परिसरातील शेत शिवार हिरवागार बहरला आहे.

घाटनांद्रा परिसरातील धारला, चारणेर वाडी पेंडगाव या महसूल मंडलांमध्ये गतवर्षी जून महिन्यात चांगला पाऊस पडला व खरिपाच्या पेरण्या लवकर झाल्या होत्या. पुढे अतिवृष्टीमुळे मका, कपाशी या पिकांचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे उत्पादनात घट झाली. शेतकऱ्यानी पेरणीसाठी केलेला खर्चही निघाला नाही.

त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला. कपाशीच्या एक दोन वेचणितच पऱ्हाट्या झाल्या. शेतकऱ्यांनी दुसरे पिक घेण्यासाठी व झालेले नुकसान भरून काढण्यासाठी लवकर शेत मोकळे केले. रिकाम्या झालेल्या शेतात उन्हाळी बाजरी व ज्वारीचे पीक घेतले. दरवर्षी दहा ते वीस एकर क्षेत्रावर होणारी यावर्षी विस ते पंचवीस क्षेत्रावर लागवड करण्यात झाली आहे.

Jowar Crop
Jowar Price: अहिल्यानगर बाजारात ज्वारीला ३६०० ते ४१०० रुपये दर

चार महिन्यांनंतर बाजरी व ज्वारीचे पीक काढणीस सुरुवात होत असते. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासूनच ज्वारीच्या सुगीला सुरुवात होणार आहे. यावर्षी इतर आंतरपिकांबरोबरच परिसरातील बालाजी मुंढे, तुकाराम ढोके, प्रदीप बोरसे, अशोक भाग्यवंत, संजय नागरे, दादाराव ढोके, विष्णू नेटके या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर यावर्षी ज्वारी, बाजरीची लागवड केली असून शेतशिवारांमध्ये बाजरी, ज्वारीचे पीक चांगलेच बहरले आहे.

Jowar Crop
Dadar Jowar : दादर ज्वारीचे एकरी १० क्विंटलपर्यंत उत्पादन

ज्वारीचे कणसे परिपक्व झालेले बघायला मिळत आहेत. सद्यःस्थितीत बाजारात बाजरीला २ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी सुरू आहे. ज्वारीला त्या खालोखाल १८०० ते २००० रुपये दराने खरेदी केली जात आहे. येत्या काळात पुढे बाजरीचा व ज्वारीचा दर वाढणार असल्याची शक्यता व्यापारी विष्णू मोरे यांनी व्यक्त केली. यामुळे उत्पादक शेतकऱ्यांना या भाववाढीचा मोठा लाभ होणार आहे.

घाटनांद्रासह परिसरात सध्या बाजरी व ज्वारीचे पीक संवेदनशील अवस्थेत आहे. पिकापासून शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन मिळणार असल्याचे शेतशिरांमध्ये बघायला मिळत आहे.
- महेश चाथे, कृषी सहायक
खरिपाचे असलेले कपाशीचे पीक काढून तीन एकर क्षेत्रावर ज्वारीच्या पिकाची लागवड केली आहे. पिकाची योग्य प्रकारे काळजी घेऊन औषध फवारणी, वेळोवेळी पिकांना पाणी देणे त्यामुळे सध्या पीक चांगले बहरले आहे.
- बालाजी मुंढे, शेतकरी, धारला

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com