Cotton Conference : जळगावात १८ सप्टेंबर रोजी कापूस व्यापार परिषद

खानदेश जिनिंग प्रेसिंग कारखानदार असोसिएशनतर्फे या परिषदेचे आयोजन करण्यात आले असून, १७ सप्टेंबर रोजी जिनिंग प्रेसिंग कारखान्यांना भेट व धरणगाव (जि. जळगाव) भागात कापूस शिवार फेरी, शेतकरी संवाद आदी कार्यक्रम होणार आहेत.
Cotton Conferenece
Cotton ConfereneceAgrowon

जळगाव ः जगातील कापूस पिकाची स्थिती (Global Cotton Crop Condition), साठा, आयात-निर्यात (Cotton Import Export) आदी मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी जळगावनजीकच्या जैन हिल्स येथे १८ सप्टेंबर रोजी ऑल इंडिया कॉटन ट्रेड मीटचे (All India Cotton Trade Meet) (अखिल भारतीय कापूस व्यापार परिषद) आयोजन करण्यात आले आहे.

Cotton Conferenece
Cotton : कापूस बाजारात अचानक तेजी का आली ?

खानदेश जिनिंग प्रेसिंग कारखानदार असोसिएशनतर्फे या परिषदेचे आयोजन करण्यात आले असून, १७ सप्टेंबर रोजी जिनिंग प्रेसिंग कारखान्यांना भेट व धरणगाव (जि. जळगाव) भागात कापूस शिवार फेरी, शेतकरी संवाद आदी कार्यक्रम होणार आहेत. तर जैन हिल्स येथे १८ सप्टेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता कापूस व्यापार परिषद हा मुख्य कार्यक्रम होणार आहे.

Cotton Conferenece
Cotton : साठ गावांत ‘एक गाव एक वाण’

त्यासाठी केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री पीयूष गोयल यांनाही आमंत्रित करण्यात आले आहे. केंद्रीय वस्त्रोद्योग आयुक्त, राज्याचे वस्त्रोद्योग आयुक्त, महाराष्ट्र राज्य जिनिंग प्रेसिंग कारखानदार असोसिएशनचे अध्यक्ष भूपेंद्रसिंह राजपाल, नॉर्थ इंडिया कॉटन असोसिएशनचे अध्यक्ष महेश सारडा, दाक्षिणात्य भागातील जिनिंग प्रेसिंग कारखानदारांबरोबरच व्हीएतनाम, बांगलादेश या देशांतील वस्त्रोद्योग क्षेत्रातील उद्योजक, तेथील आयातदार, देशातील निर्यातदार, उद्योजक आदी या परिषदेत सहभागी होतील.

१८ रोजी दिवसभर कापूस व्यापार व इतर मुद्द्यांवर विविध सत्रांत अभ्यासक, जाणकार आपली माहिती सादर करतील, अशी माहिती खानदेश जिनिंग प्रेसिंग कारखानदार असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप जैन यांनी दिली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com