Cotton Market
Cotton MarketAgrowon

Cotton Rate Improvement: कापसाच्या दरात २०० रुपयांपर्यंत सुधारणा; सीसीआयची जास्त दरात कापूस विक्री

Cotton Market : देशात यंदा सुरुवातीपासूनच कापसाचे भाव दबावात असल्याने सीसीआयची खरेदी जास्त झाली. सीसीआयने देशात आतापर्यंत १ कोटी गाठी कापसाची खरेदी केली.
Published on

Pune News : देशात यंदा सुरुवातीपासूनच कापसाचे भाव दबावात असल्याने सीसीआयची खरेदी जास्त झाली. सीसीआयने देशात आतापर्यंत १ कोटी गाठी कापसाची खरेदी केली. सर्वाधिक खरेदी तेलंगणात झाली आहे.

तर त्यानंतर महाराष्ट्रात २९ लाख गाठींची खरेदी झाली. सीसीआय कापसाची विक्री करत आहे. मात्र खुल्या बाजारातील दरापेक्षा जास्त दरात सीसीआयचा कापूस विकला जात आहे. त्याचा आधार कापूस दराला मिळत आहे. कापसाच्या दरातही १०० ते २०० रुपयांची सुधारणा दिसून आली.

केंद्र सरकारने यंदा मध्यम लांब धाग्याच्या कापसासाठी ७ हजार १२१ रुपये आणि लांब धाग्याच्या कापसासाठी ७ हजार ५२१ रुपये हमीभाव जाहीर केला आहे. मात्र बाजारात आतापर्यंत कापसाचे भाव हमीभावापेक्षा कमीच राहीले. कापूस ६ हजार ७०० ते ७ हजारांच्या दरम्यान विकला गेला.

मात्र दोन-तीन दिवसांपासून कापसाच्या भावात पुन्हा काहीशी सुधारणा दिसून आली. पण भाव हमीभावाच्या खालीच आहेत. बाजारभाव कमी असल्याने काही शेतकऱ्यांनी माल मागेही ठेवला. तर शेतकऱ्यांनी यंदा सीसीआयला कापूस देण्यास पसंती दिली आहे.

Cotton Market
Cotton Farming : बारा महिलांनी केली कपाशीची यशस्वी गटशेती ; मजूरसमस्येवर शोधले उत्तर

खुल्या बाजारात भाव कमी असल्यामुळे सीसीआयची खरेदी चांगली झाली. सीसीआयने आतापर्यंत १ कोटी गाठी (१०० लाख गाठी) कापूस खरेदी केला. बाजारात आवक झालेल्या एकूण कापसापैकी तब्बल ४४ टक्के कापूस सीसीआयने खरेदी केला. सीसीआयचा आधार बाजाराला मिळाल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील मंदीचा दबाव असतानाही बाजार जास्त कोसळला नाही. देशात भावपातळी ६ हजार ७०० ते ७ हजारांच्या दरम्यान दिसली.

राज्यनिहाय खरेदी

सीसीआय देशभरात खरेदी केलेल्या १ कोटी गाठींपैकी ४० लाख गाठी कापूस तेलंगणात खेरदी केला. म्हणजेच एकट्या तेलंगणात ४० टक्के कापसाची खरेदी झाली. तर महाराष्ट्रात २९ लाख गाठी कापूसाची खेरदी झाली. गुजरातमध्ये १३ लाख गाठी, कर्नाटकात ६ लाख आणि मध्य प्रदेशात ४ लाख गाठी कापसाची खरेदी झाली. उर्वरित राज्यांमध्येही यंदा खरेदी करण्यात सीसीआयला यश आले.

Cotton Market
Cotton Procurement : कापूस खरेदीमध्ये शेतकऱ्यांची पिळवणूक

सीसीआयची विक्री चढ्या भावात

देशात सध्या सीसीआय सर्वात मोठा कापसाचा स्टाॅकीस्ट आहे. सीसीआय बाजारात कापसाची विक्री करत आहे. मात्र बाजारातील भावापेक्षा सीसीआयच्या विक्रीचे भाव जास्त आहे. खुल्या बाजारात कापूस खंडीचे भाव गुणवत्तेनुसार ५२ हजार ते ५४ हजार रुपयांच्या दरम्यान आहेत. मात्र सीसीआयच्या लिलावात १७ मार्चला कापसाची विक्री ५४ हजार ते ५५ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान झाली.

सीसीआयाने २ लाख ८ हजार गाठी कापूस विकला. त्यापैकी मिल्सनी ९४ हजार ५०० गाठी तर व्यापाऱ्यांनी १ लाख १३ हजार गाठी कापसाची खरेदी केली. सीसीआयचा कापूस व्यापारी आणि मिल्स चढ्या दरात खरेदी करत आहेत. त्यामुळे खुल्या बाजारातही कापूस दराला आधार मिळत आहे.

सीसीआयने देशात १ कोटी गाठी कापूस खेरदी केला. सीसीआयला कापूस विक्रीसाठी नोंदणी १५ मार्चला बंद झाली. मात्र नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचा कापूस खरेदी केला जाईल. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे ते शेतकरी सीसीआयला कापूस देऊ शकतात.
- ललितकुमार गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी, सीसीआय

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com