Cotton Rate: कापसाचे भाव तीन कारणांमुळे कमी? अमेरिकेच्या बाजारातही कापूस दबावातच

Cotton Market Update: भारतातच नव्हे, तर अमेरिकेच्या बाजारातही कापसाचे दर दबावात आले आहेत. डॉलरच्या वाढलेल्या किमती, तेलाच्या घसरलेल्या दरांचा परिणाम, आणि जागतिक मागणीतील घट यामुळे कापसाच्या भावात मोठी घसरण झाली आहे. अमेरिकेतील शेतकरीही या परिस्थितीमुळे अडचणीत आले आहेत.
Cotton
CottonAgrowon | Esakal.com No. 1 Marathi news website in India
Published on
Updated on

Pune News: केवळ भारतातच नाही तर अमेरिकेच्या बाजारातही कापसाचे भाव दबावात आहेत. अमेरिकेत भाव कमी होण्याला प्रामुख्याने डाॅलरचे वाढते मूल्य, त्यामुळे निर्यातीसाठी वाढलेले भाव आणि कच्च्या तेलाचे कमी झालेले भाव हे घटक कारणीभूत आहेत. तसेच जागतिक बाजारात सध्या कापसाला अपेक्षित उठाव नाही. त्याचाही दबाव दरावर येत आहे.

अमेरिकेच्या बाजारात कापसाचे भाव दबावात आहेत. मार्च, मे आणि जुलैच्या वायद्यांमधील भावही कमी झाले आहेत. आज दुपारपर्यंत मे महिन्याचे वायदे गेल्या १५ दिवसांच्या निचांकी पातळीवर पोचले होते. वायदे ६६.८५ सेंट प्रतिपाऊंडवर आहेत. अमेरिकेत कापसाचे भाव कमी असल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. तसेच ट्रडिंग व्हाॅल्यूमही कमी झाला.

Cotton
Cotton Rate: अमेरिकेतील शेतकरी कापसाची लागवड कमी करणार; उत्पादन खर्चही निघाला नाही

कापसाच्या दरावर दबाव वाढण्याला प्रामुख्याने काही कारणे आहेत. त्यात प्रामुख्याने डाॅलरचे वाढते मूल्य हे एक कारण आहे. डाॅलरचा भाव आपल्या ११ आठवड्यातील किमान दरावरून सुधारला आहे. डाॅलरचा भाव इतर चलनाच्या तुलनेत वाढल्याने म्हणजेच डाॅलर महाग झाल्याने इतर देशांना अमेरिकेतून कापूस खरेदी करताना महाग पडत आहे. अमेरिकेच्या तुलनेत ब्राझील आणि ऑस्ट्रेलियाचा कापूस स्वस्त पडत आहे. त्यामुळे कापसाचे आयातदार अमेरिकेऐजी इतर देशांमधून कापसाची खरेदी करत आहेत.

Cotton
Cotton Rate: अमेरिकेतील शेतकरी कापसाची लागवड कमी करणार; उत्पादन खर्चही निघाला नाही

कापसाच्या भावावर कच्च्या तेलाच्या भावाचाही परिणाम होत आहे. अमेरिकेत तेलाचा स्टाॅक वाढला आहे. यामुळे तेलाची मागणी कमी झाल्याचे स्पष्ट होत. यामुळे कच्च्या तेलाचे भाव कमी होण्यास मदत झाली. तसेच जागतिक पातळीवरील भू-राजकीय समस्यांमुळे तेलाचे भाव कमी झाले आहेत. कच्च्या तेलाचे भाव कमी झाल्यामुळे पाॅलिस्टरचे भाव कमी झाले. पाॅलिस्टर हे कापसाला पर्याय म्हणून कापड निर्मितीसाठी वापरले जाते. पण आता पाॅलिस्टर सव्सत झाल्याने कापसाच्या भावावरही दबाव आला.

अमेरिकेतील कापसाचे भाव सध्या गेल्या पाच वर्षातील निचांकी पातळीवर आहेत. यापुर्वी सप्टेंबर २०२० मध्ये कापसाचे भाव ६७ सेंटच्या खाली आले होते. त्यानंतर सध्या हा भाव मार्केटमध्ये दिसत आहे. पण दुसरीकडे कापसाचा उत्पादन खर्च वाढला. त्यामुळे अमेरिकेतील कापूस उत्पादकांचा उत्पादन खर्चही भरून निघाला नाही. परिणामी अमेरिकेतील शेतकऱ्यांचेही अर्थकारण कोलमडले आहे. त्यामुळे २०२५ मध्ये अमेरिकेतील शेतकरी कापसाची लागवड कमी करतील असा अंदाज अमेरिकेच्या नॅशनल काॅटन काऊंसीलने व्यक्त केला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com