Cotton Rate: कापसाचे नऊ हजारांवर दर;पण एकरी उत्पादनात घट

सध्या शेतशिवारात कापूस वेचणीची लगबग सुरू आहे. कापूस आजमितीला नऊ हजार दोनशे रुपये क्विंटल दराने खरेदी केला जात आहे.
Cotton Production
Cotton ProductionAgrowon

आसेगावपूर्णा, जि. अमरावती : सध्या शेतशिवारात कापूस (Cotton Production) वेचणीची लगबग सुरू आहे. कापूस आजमितीला नऊ हजार दोनशे रुपये क्विंटल दराने खरेदी (Cotton Procurement) केला जात आहे. एकीकडे भाव मिळत असताना काही ठिकाणी अतिवृष्टीचा फटका बसल्याने कापसाचे एकरी उत्पादन ७० ते ८० टक्क्यांनी घटले आहे. दर आहे, पण उत्पादन घटल्याने ‘कहीं खुशी, कहीं गम’ अशी उत्पादकांची अवस्था झाली आहे.

Cotton Production
Cotton Rate : दरवाढीच्या आशेने कापूस आवक मंदावली

परिसरात कापूस व सोयाबीन ही मुख्य नगदी पिके आहेत. शेतकऱ्यांची याच पिकांवर मुख्य मदार असते. पिके ऐन तेजीत असताना परिसरात ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात बहुतांश ठिकाणी अतिवृष्टी झाली. दहा-पंधरा दिवस कधी संततधार तर कधी मुसळधार पावसाने शेतकऱ्यांना हैराण केले. सूर्यदर्शन देखील दुर्लभ झाले होते. शेतात पाणी साचले होते. अनेक दिवस शेतातील पाणी निघालेच नाही. त्यामुळे शेतातील पिकांची वाढ खुंटली. कापसाचे पानेदेखील पिवळी पडली. पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला. फवारणी करूनही काहीच फरक पडला नाही.

Cotton Production
Sugar Production : जगात यंदा साखर उत्पादन वाढणार

दिवाळीच्या पूर्वसंध्येला मोठ्या अपेक्षेने कापूस वेचणीला शेतकऱ्यांनी सुरुवात केली. परंतु कापसाचा उतारा एकरी मोठ्या प्रमाणात घसरला. एकरी दोन ते तीन क्विंटल कापूस निघाला. दरवर्षी एकरी आठ ते दहा क्विंटल कापूस निघत होता. माल खूपच कमी निघत असल्याने दर वाढले. मागणी इतका पुरवठा येत नसल्याने नऊ हजारांपर्यंत कापूस पोहोचला. आज प्रतिक्विंटल नऊ हजार दोनशे रुपये दराने कापूस खरेदी केला जात आहे. शासनाकडून नुकसानभरपाई मिळते. परंतु अनेक गावांत अतिवृष्टी होऊन देखील त्या गावांचा नुकसानभरपाईच्या यादीत समावेश झालेला नाही, ही खंत आहे.

अतिवृष्टीमुळे प्रमुख पिकांचे उत्पादन घटले. बियाणे, लागवड, फवारणी, वेचणीचा खर्च बघता उत्पादन खर्चदेखील निघणार नाही. परिणामी, शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट यंदा कोलमडणार आहे. तुटपुंजी रक्कम न देता अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पन्नास ते साठ टक्के नुकसानभरपाई द्यावी.

-सुमीत बोबडे, विरूळपूर्णा, शेतकरी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com