Cotton Rate : दरवाढीच्या आशेने कापूस आवक मंदावली

Team Agrowon

जागतिक संस्था कापसाच्या दरात मोठी तेजी येण्याची शक्यता नाही, असं सांगत आहेत. भारतातील कापसाशी संबंधित संस्था उत्पादनाचे आकडे जास्त दाखवत आहेत.

Cotton Rate | Cotton

परंतु बाजारावर याचा परिणाम झालेला नाही. बहुतेक बाजारांमध्ये कापसाचा कमाल दर आता प्रति क्विंटल ९५०० रुपयांच्या दरम्यान पोचलाय.

Cotton Rate | Cotton

सरासरी दर ९ हजारांपर्यंत मिळतोय. मात्र तरीही बाजारातील आवक वाढली नसल्याचं व्यापारी सांगत आहेत. अनेक शेतकरी १० हजारांशिवाय कापूस विकणार नाही, असं सांगत आहेत.

Cotton Rate | Cotton

इक्रा या जागतिक पतमापन संस्थेच्या म्हणण्यानुसार जुलै-सप्टेंबर तिमाहीमध्ये कापूस दरातील तेजीमुळे आणि इतर खर्चात प्रचंड वाढ झाल्यामुळे कापूस उद्योग संकटात सापडलाय.

Cotton Rate | Cotton

त्यामुळे त्यांच्या कामगिरीवर प्रतिकूल परिणाम होईल. तर अमेरिकी कृषी खात्याच्या म्हणजे यूएसडीएच्या अनुमानानुसार जागतिक कापूस व्यापार येत्या हंगामात अजून १० लाख गाठींनी आक्रसला जाईल.

Cotton Rate | Cotton

ऑस्ट्रेलिया, ब्राझील, भारत, ग्रीस आणि मेक्सिकोमधून निर्यात आधीच्या अंदाजापेक्षा कमी होईल, असंही यूएसडीएनं म्हटलंय.

Cotton Rate | Cotton
cta image | Agrowon