Cotton Procurement : परभणी, हिंगोली जिल्ह्यांत साडेबारा लाख क्विंटल कापूस खरेदी

Cotton Market : सीसीआयकडून एमएसपीने परंतु ओलाव्याच्या प्रमाणानुसार प्रतिक्विंटल किमान ७००० ते कमाल ७४७१ रुपये दर देण्यात आले.
Cotton
CottonAgrowon
Published on
Updated on

Parbhani News : परभणी व हिंगोली जिल्ह्यांत शुक्रवार (ता. २४)पर्यंत सीसीआयच्या ११ केंद्रांवर ९ लाख १६ हजार ४९१ क्विंटल आणि खासगी ३ लाख ५९ हजार ८७१ क्विंटल मिळून एकूण १२ लाख ५६ हजार १३२ क्विंटल कापूस खरेदी झाली आहे.

सीसीआयकडून एमएसपीने परंतु ओलाव्याच्या प्रमाणानुसार प्रतिक्विंटल किमान ७००० ते कमाल ७४७१ रुपये दर देण्यात आले. खासगी व्यापाऱ्याकडून प्रतिक्विंटल ६५०० ते कमाल ७२५० रुपये दराने कापूस खरेदी करण्यात आली.

Cotton
CCI Cotton Procurement : ‘सीसीआय’ फेब्रुवारीत गुंडाळणार कापूस खरेदी

राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाच्या परभणी झोन अंतर्गत यंदा परभणी, बोरी, जिंतूर, सेलू, मानवत, पाथरी, गंगाखेड, ताडकळस, हिंगोली, वसमत, जवळाबाजार या ११ ठिकाणच्या २० जिनिंग कारखान्यांमध्ये सीसीआयतर्फे किमान आधारभूत किंमत दराने कापूस खरेदी केली जात आहे.

शुक्रवार (ता. २४)पर्यंत परभणी जिल्ह्यातील ८ केंद्रांवरील १७ जिनिंग कारखान्यांमध्ये ७ लाख ८६ हजार ६९५ क्विंटल कापसाची खरेदी झाली. हिंगोली जिल्ह्यातील ३ केंद्रांवर १ लाख २९ हजार ७९६ क्विंटल कापूस खरेदी झाली.

Cotton
Cotton-Soybean Procurement : कापूस-सोयाबीन खरेदीपोटी शेतकऱ्यांना २८०० कोटी ; 'लाडकी बहीण'ही ठरतेय गेमचेंजर

परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील ११ कृषी उत्पन्न बाजार समित्यांअंतर्गंत ४४ जिनिंग कारखान्यांमध्ये खासगी व्यापाऱ्याकडून कापूस खरेदी सुरू आहे. शुक्रवार (ता. २४)पर्यंत परभणी जिल्ह्यातील ३९ जिनिंग कारखान्यांमध्ये ३ लाख ३३ हजार ७७४ क्विंटल कापूस खरेदी झाली असून, प्रतिक्विंटल किमान ६५०० ते कमाल ७२५० रुपये दर मिळाले.

हिंगोली जिल्ह्यात ५ जिनिंग कारखान्यांमध्ये २६ हजार ९७ क्विंटल कापूस खरेदी झाली असून, प्रतिक्विंटल किमान ६९०० ते कमाल ७१०० रुपये दराने खरेदी करण्यात आली, अशी माहिती पणन महासंघाच्या सूत्रांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com