Agrowon Podcast : कापसात चढ उतार कायम; कापूस, सोयाबीन, आले तसेच काय आहेत केळीचे दर ?

Commodity Market : आज आपण सोयाबीन, कापूस, आले, केळी आणि गवार पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत.
Agriculture Market
Agriculture Market Agrowon
Published on
Updated on

Market Bulletin :

सोयाबीनमध्ये सुधारणा

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावात आठवड्याच्या शेवटी म्हणजेच शुक्रवारी सोयाबीन आणि सोयापेंडच्या भावात चांगली सुधारणा झाली. शुक्रवारी सोयाबीनचे वायदे वाढून १०.६६ डाॅलर प्रतिबुशेल्सपर्यंत वाढ झाली होती. तर सोयापेंडच्या वायद्यांनी ३४४ डाॅलर प्रतिटनांचा टप्पा गाठला होता. देशातील बाजारात सोयाबीनचा भाव कायम होता. सोयाबीनचा भाव सध्या ४ हजार ६०० ते ४ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान आहे. तर प्रक्रिया प्लांट्सनी आपला भाव ४ हजार ८०० ते ४ हजार ९५० रुपयांच्या दरम्यान काढला होता. सोयाबीनच्या भावातील चढ उतार कायम राहू शकतात, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

कापसात चढ उतार सुरुच

कापसाच्या भावातील चढ उतार आठवड्याच्या शेवटी म्हणजेच शुक्रवारीही कायम होते. आंतरराष्ट्रीय बाजारातील भाव शुक्रवार गुरुवाच्या तुलनेत कमी झाले होते. आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे ७२.७३ सेंट प्रतिपाऊंडवर बंद झाले होते. तर देशातील वायदे काहीसे वाढून ५८ हजार १०० रुपये प्रतिखंडीवर होते. जागतिक बाजारात सध्या कापसाच्या भावावरील दबाव कायम दिसतो. तर देशातील कापूस पुढील महिनाभरात बाजारात दाखल होईल. त्यामुळे कापसाच्या भावातील चढ उतार कायम राहू शकतात, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला. 

Agriculture Market
Moong Rate : हिंगोली बाजार समितीत मूग १०,००० ते १३,०५० रुपये दर

गवारला चांगला उठाव

बाजारातील गवारची आवक मागील काही दिवसांपासून चांगलीच कमी झाली आहे. त्यामुळे गवारचा भावही टिकून आहे. मागे राज्याच्या अनेक भागात झालेल्या पावसाचा फटक गवार पिकाला बसला आहे. त्यामुळे बाजारातील आवक घटली आहे. सध्या गवारला प्रतिक्विंटल सरासरी ४ हजार ते ५ हजार रुपयांचा भाव मिळत आहे. गवारचा हा भाव पुढील काही दिवस कायम राहू शकतो, असा अंदाज भाजीपाला बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

Agriculture Market
Agrowon Podcast : कांद्यात काहिशी नरमाई; कापूस, सोयाबीन, गहू तसेच काय आहेत हरभरा दर?

केळीला उठाव कायम 

बाजारात सध्या केळीचा उठाव कायम आहे. केळीला गेले महिनाभर मागणी टिकून होती. सध्या गणेशोत्सवामुळे भावही चांगले आहेत. तर यापुढे नवरात्रीमुळेही चांगली मागणी राहण्याची शक्यता आहे. पण दुसरीकडे केळीचा पुरवठा मागणीच्या तुलनेत खूपच कमी आहे. परिणामी केळीला सध्या १ हजार ८०० ते २ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. केळीचा पुरवठा पुढच्या काळातही मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे केळीचे भावही टिकून राहतील, असा अंदाज केळी बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.    

आल्याचे भाव टिकून

आल्याचे भाव मागील काही आठवड्यांपासून स्थिरावले आहेत. आल्याची लागवड यंदा वाढलेली दिसत असली तरी सध्या बाजारातील आवक खूपच कमी आहे. तर दुसरीकडे आल्याला उठाव चांगला आहे. त्यामुळे आल्याचे भाव टिकून आहेत. सध्या आल्याची सरासरी भावापातळी सध्या ७ हजार ते ९हजार रुपयांच्या दरम्यान दिसून येत आहे. आल्याची ही भावपातळी आणखी काही दिवस टिकून राहू शकते. तर पुढील काळात बाजारातील आवक कमी झाल्यानंतर दाराला काहीसा आधार मिळेल, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com