
Ratnagiri News: रत्नागिरी जिल्ह्यात धार्मिक कार्य, लग्नसमारंभ, देवदर्शनासह हॉटेल व्यावसायिकांकडून नारळाला प्रचंड मागणी असते. त्यामधून दर वर्षी कोट्यवधींची उलाढाल होते. मात्र गेल्या काही वर्षांत बदलणाऱ्या हवामान, असंतुलित पाऊस आणि कीड- रोगांचा सातत्याने होणाऱ्या प्रादुर्भावामुळे निसर्गाच्या दुष्टचक्रात अडकला आहे. उत्पादन घटल्यामुळे मागणी आणि पुरवठा याचा समतोल बिघडत असून नारळाच्या दराने सरासरी ‘पन्नाशी’ गाठली आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये कोकण किनारपट्टीवर सतत विविध प्रकारची वादळे येत आहेत. वादळे आणि अतिवृष्टीत पिळवटून नारळाच्या झाडाचा शेंडा तुटणे, पोय खराब होणे यासारखे प्रकार घडत आहेत. कोकण किनारपट्टीवर आलेली वादळे आणि अतिवृष्टीचा परिणाम दिसत आहे. खत आणि कीड-रोग नियंत्रणाच्या योग्य नियोजनाच्या अभावाचा परिणामही आहे. सद्यःस्थितीत उत्पादन घटण्याला गेल्या चार-पाच वर्षांमध्ये सातत्याने आलेली वादळे आणि अतिवृष्टीचा प्रतिकूल परिणाम आता दिसत असल्याचे तज्ज्ञांकडून सांगितले जाते.
बदलते हवामान, कीड-रोगाचा प्रादुर्भाव, वन्यजीवांचा त्रास आदी विविध कारणांमुळे नारळाचे उत्पादन कमालीचे घटले आहे. सर्वसाधारणतः एका नारळाच्या झाडापासून वा माडापासून सरासरी १२० नारळ (फळ) एका हंगामात मिळणे अपेक्षित आहे. अपेक्षित उत्पादनात घट होऊन सद्यःस्थितीमध्ये ९०-९५ फळे मिळत आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये नारळाच्या झाडाचा शेंडा मरणे, फळगळती, फुलोरा मोडून जाणे यांसारख्या विविध समस्यांना बागायतदारांना सामोरे जावे लागत आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात दर वर्षी सुमारे ४ लाख नारळ नगांचे उत्पादन होते. मात्र तुलनेत मागणी २० ते २२ लाख नारळांची आहे. सुमारे १६ लाख नारळांचा फरक भरून काढण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात केरळ, तमिळनाडू येथून नारळ आयात केला जातो. नारळाची झावळे, काथ्या आदी विविध घटकांपासून अन्य विविध उत्पादन घेणेही शक्य आहे. त्यामुळे शेतकरी, बागायतदारांनी पाणी उपलब्ध असलेल्या ठिकाणी हापूस आंबा-काजू या फलोत्पादनाच्या जोडीने नारळ बागायती विकसित केल्यास निश्चितच त्याचा फायदा होणार आहे.
दृष्टिक्षेपात रत्नागिरी जिल्हा
नारळ क्षेत्र : ५,६५६ हेक्टर क्षेत्र
वर्षभर उलाढाल : २०-२२ लाख फळ नग
रत्नागिरी जिल्हा
नारळ उत्पादन : ४ लाख ६ हजार फळ नग
किती उत्पादन वाढविण्याची गरज : १६ लाख फळ नग
रत्नागिरीत कुठून येतात नारळ : महाराष्ट्राच्या विविध भागांसह केरळ, तमिळनाडू
सद्यःस्थितीतील नारळाचे दर
छोटा आकाराचा नारळ : १५-२० रुपये
मध्यम आकाराचा नारळ : २५-३० रुपये
मोठ्या आकाराचा नारळ : ३५-४५ रुपये
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.