Cotton Market: सीएआयचा कापूस उत्पादनाचा अंदाज चुकला; म्हणते उत्पादन जास्तच !

Cotton Market Update : देशातील कापूस उत्पादन ३११ लाख १८ हजार गाठी झाल्याचे सीएआय आता म्हणत आहे. पण कापूस उत्पादनाचे अंदाज चुकत असल्याचा फटका मात्र शेतकऱ्यांना बसत आहे.
Cotton Farming
Cotton FarmingAgrowon
Published on
Updated on

Pune News : काॅटन असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात सीएआयचा कापूस उत्पादनाचा अंदाज चुकला. आता सीएआयने आपला सुधारित अंदाज जाहीर करून १२ लाख ५३ हजार गाठींनी वाढ केली. देशातील कापूस उत्पादन ३११ लाख १८ हजार गाठी झाल्याचे सीएआय आता म्हणत आहे. पण कापूस उत्पादनाचे अंदाज चुकत असल्याचा फटका मात्र शेतकऱ्यांना बसत आहे.

सीएआयने मे महिन्यात देशातील कापूस उत्पादनाचा अंदाज कमी करून २९८ लाख गाठी केला होता. तर देशातील वापर ३११ लाख गाठी सांगितला होता. म्हणजेच देशातील कापूस उत्पादन कापूस वापरापेक्षा कमी होते. परिणामी कापूस भाव चांगले राहतील, असा अंदाज व्यक्त केला जात होता.

Cotton Farming
Cotton Rate : परभणीत कापसाच्या दरात किंचित घसरण

यंदा शेतकऱ्यांनी कापूस मागे ठेवला होता. काॅटन असोसिएशन ऑफ इंडिया बाजारातील आलेल्या कापसावरून सरासरी काढून आपला अंदाज व्यक्त करते. असोसिएशनच्या सदस्यांचाही अंदाज घेतला जातो. पण यंदा बाजारात ऑक्टोबर ते जानेवारी या महत्वाच्या कापूस आवकेच्या काळात यंदा बाजारातील आवक कमी झाली. बाजारात आवक कमी असल्याने उत्पादनाचे अंदाजही कमी केले गेले.

दुसरीकडे शेतकरीही यंदा उत्पादन कमी असल्याचे सांगत होते. बाजारातील आवकही कमीच होती. पण गुजरात, महाराष्ट्र, तेलंगणा आदी सर्वच महत्वाच्या कापूस उत्पादक राज्यांमध्ये शेतकऱ्यांनी कापूस मागे ठेवला होता.

यामुळे संस्थांना आपला अंदाज देण्यात अडचणी आल्या. त्यात काॅटन असोसिएशन ऑफ इंडियाही होती. आता सीएआयने नुकतेच मुंबई येथे कापूस मुल्यसाखळीतील सर्व घटकांची बैठक घेतली होती. या बैठकीत देशातील बाजारात किती कापूस आला आणि उत्पादन किती याचा आढावा घेण्यात आला.

असा बदलला अंदाज

बैठकीनंतर सीएआयने कापूस उत्पादनाच्या अंदाजात वाढ केली. सीएआयने कापूस उत्पादनाच्या अंदाजात तब्बल १२ लाख ५३ हजार गाठींची वाढ केली. मे महिन्याचा अंदाज २९८ लाख ६५ हजार गाठींचा होता. हा अंदाज २००८-०९ मधील २९० लाख गाठींनंतर सर्वात कमी होता. आता मात्र सीएआयने यंदाच्या अंदाजात वाढ केली असून ३११ लाख १८ हजार गाठींवर नेला.

मागील हंगामातील कापूस उत्पानाचा अंदाजही कमी करून २९९ लाख गाठींपर्यंत कमी करण्यात आला. चालू हंगाम संपण्यास केवळ तीन महिन्यांचा कालावधी बाकी असताना सीएआने आपला अंदाज बदलला. यामुळे सीएआयच्या भुमिकेवरही शेतकरी आणि जाणकार प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.

Cotton Farming
Cotton Sowing : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एक लाख हेक्टरवर कपाशी लागवड

अंदाजात एकमत नाही

यंदा देशातील आघाडीच्या संस्थांंचे अंदाज वेगवेगळे होते. सीएआयने आपला अंदाज आता ३११ लाख १८ हजार गाठींवर नेला. सरकारचा अंदाज ३४३ लाख गाठींचा आहे. तर कापूस उत्पादन आणि वापर समिती अर्थात सीसीपीसीचा अंदाज ३३७ लाख गाठींचा आहे. या बैठकीला सीएआयच्या पीक समितीचे ५५ सदस्य हजर होते.

या सदस्यांच्या मते देशातील बाजारात आतापर्यंत जवळपास २८२ लाख गाठी कापूस बाजारात आला. यापैकी मध्य भारतात १७२ लाख गाठी कापूस शेतकऱ्यांनी विकला. दक्षिण भारतातील बाजारात ६५ लाख गाठींची आवक झाली होती. तर उत्तर भारतात आतापर्यंत ३९ लाख गाठींची आवक झाली.

शेतकऱ्यांचे नुकसान

यंदा कापूस उत्पादनाचे अंदाज चुकल्याचा फटका मात्र शेतकऱ्यांना बसला. सुरुवातीच्या काळात कापूस आवक कमी असल्याने भावही अधिक होते. बाजारात कापूस कमी आल्याने विविध संस्थांनीही आपले अंदाज कमी केले. पण मार्चपासून बाजारातील कापूस आवक वाढली. कापूस आवकेत अपेक्षेपेक्षा अधिक वाढ झाली.

परिणामी बाजार दबावात आला. बाजारात भाव हंगामातील निचांकी पातळीवर पोचले. आजही जुलैच्या मध्यात कापूस ६ हजार ५०० ते ७ हजार २०० रुपये भाव मिळाला. याचा फटका मात्र शेतकऱ्यांना बसला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com