Parbhani News : परभणी जिल्ह्यातील मानवत, सेलू, परभणी या कापसाच्या प्रमुख बाजार पेठांमधील कापसाची आवक कमी झाली आहे. लिलावद्वारे होणाऱ्या कापूस खरेदी दरात किंचित चढउतार होत आहेत. गेल्या आठवड्याच्या तुलनेत दरात किंचित घसरण झाली.
सोमवारी (ता. १०) सेलू बाजार समितीमध्ये कापसाला प्रतिक्विंटल किमान ६३०० ते कमाल ७२३० रुपये तर सरासरी ७१७० रुपये दर मिळाले. मानवत बाजार समितीत कापसाची १९० ते २०० गाड्या आवक असताना प्रतिक्विंटल किमान ६००० ते कमाल ७१५० रुपये तर सरासरी ७०५० रुपये दर मिळाले.
परभणी बाजार समितीत सुमारे १०० क्विंटल आवक होती. कापसाला किमान ६५०० ते कमाल ७३०० रुपये तर सरासरी ७२५० रुपये दर मिळाले. सेलू बाजार समितीत शनिवारी (ता. ८) कापलाला प्रतिक्विंटल किमान ६००० ते कमाल ७२२५ रुपये तर सरासरी ७१२५ रुपये दर मिळाले.
शुक्रवारी (ता. ७) कापसाला प्रतिक्विंटल किमान ६१०० ते कमाल ७२९५ रुपये तर सरासरी ७२४० रुपये दर मिळाले. गुरुवारी (ता. ६) कापसाला प्रतिक्विंटल किमान ६१०० ते कमाल ७२४५ रुपये तर सरासरी ७२३० रुपये दर मिळाले. बुधवारी (ता. ५) कापसाला प्रतिक्विंटल किमान ६३१५ ते कमाल ७३४० रुपये तर सरासरी ७२५० रुपये दर मिळाले.
सेलू बाजार समितीत कापसाच्या दरात किंचित घसरण झाली आहे. मानवत बाजार समितीत शुक्रवारी (ता. ७) कापसाची १६५० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विटंल किमान ६००० ते कमाल ७२०० रुपये तर सरासरी ७१०० रुपये दर मिळाले. गुरुवारी (ता. ६) कापसाची ६२५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ६००० ते कमाल ७२३५ रुपये तर सरासरी ७१५० रुपये दर मिळाले.
बुधवारी (ता. ५) कापसाची ६४० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विटंल किमान ६३०० ते कमाल ७३७० रुपये तर सरासरी ७२८० रुपये दर मिळाले. गेल्या आठवड्याच्या तुलनेत मानवत बाजार समितीत कापसाची आवक कमी झाली आहे. खरेदी दरात किंचित चढउतार सुरूच आहे. किमान व किमान दरात किंचित चढउतार होत आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.