Hingoli News : किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत हिंगोली व परभणी जिल्ह्यांत २१ खरेदी केंद्रांवर शुक्रवार (ता.१०) पर्यंत १५ हजार २७८ शेतकऱ्यांचा २ लाख ६१ हजार ८५६ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला. ‘महाएफपीसी’ अंतर्गत प्रतिक्विंटल ५३३५ रुपये दराने ही खरेदी झाली.
यंदा हिंगोली जिल्ह्यातील १२ शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या केंद्रांवर ९ हजार ३६२ शेतकऱ्यांचा १ लाख ५८ हजार ३८९ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला. तर परभणी जिल्ह्यातील ९ कंपन्यांच्या खरेदी केंद्रांवर ५ हजार ९१६ शेतकऱ्यांचा १ लाख ३ हजार ४६७ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला.
हिंगोली, परभणी जिल्ह्यांतील अनेक शेतकरी उत्पादक कंपन्या मागील काही वर्षांपासून शेतमाल विपणन प्रक्रियेत उतरल्या आहेत. गावानजीकच्या खरेदी केंद्राच्या सुविधेमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
हमीभावातील हरभरा खरेदीची स्थिती
केंद्र शेतकरी उत्पादक कंपनी शेतकरी संख्या हरभरा खरेदी (क्विंटल)
जवळा बुद्रूक...किसान दिशा शेतकरी उत्पादक कंपनी...१२०८...२३१२०
उमरा फाटा...दत्त गुरू शेतकरी उत्पादक कंपनी...११८६...२१२०६
दारेफळ...कृषिधन शेतकरी उत्पादक कंपनी...१२८९...१८७८८
तेलगाव...सूर्या फार्मर्स प्रोड्युसर्स कंपनी...११०१...१७९२४
जवळा बाजार...स्वास्तिक शेतकरी उत्पादक कंपनी...११५१...१७२६३
फाळेगाव...श्रीफाळेश्वर महाराज शेतकरी उत्पादक कंपनी...८२७...१४५५६
डिग्रस कोंढूर...हिंगोली जिल्हा कयाधू शेतकरी उत्पादक कंपनी...६६८...११९७१
रिधोरा...श्रीबेलेश्वर शेतकरी उत्पादक कंपनी...५७०...१०३८३
डोंगरकडा ...श्रीदत्त शेतकरी उत्पादक कंपनी...५१४...८३८३
आडगाव...सातरंग धान्य शेतकरी उत्पादक कंपनी...४६५...७७१७
कोळसा...बसेश्वर उत्पादक कंपनी...३५१...६३७५
पिंपरी तुर्क...नागनाथ सेंद्रिय शेतकरी उत्पादक कंपनी...३२...७०३
जांब...दत्त प्रयाग शेतकरी उत्पादक कंपनी...९२८...१६६१७
सिरसम...टि.एन.पाटील शेतकरी उत्पादक कंपनी...१०७७...१६५९०
एरंडेश्वर...जगतगुरु संत तुकाराम अॅग्रो प्रोड्युसर्स कंपनी... ८०७...१५६२८
रहाटी...धनसंचय अॅग्रो प्रोड्युसर्स कंपनी...७९४...१३७४९
दूधगाव...भूमीक्रांती शेतकरी उत्पादक कंपनी...६८३...१३५२९
वर्णा...वर्णेश्वर अॅग्रो प्रोड्युसर्स कंपनी...६३८...१०७३०
लिंबेदेवी...अजंता सेल्फ रेलियंट शेतकरी उत्पादक कंपनी...५४८...८२६१
पिंपळदरी...दत्तकृपा शेतकरी उत्पादक कंपनी...२८१...४९२८
टाकळी कुंभकर्ण...पांडुरंग कृषी विकास शेतकरी उत्पादक कंपनी...१६०...३४२९
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.