Chana Market : हरभऱ्याला हमीभावापेक्षा ८०० रुपये कमी भाव

Chana Stock : सरकारकडे आता हरभऱ्याचा जवळपास ३८ लाख टनांचा स्टाॅक झाला. हा स्टाॅक सरकार पुढील काळात बाहेर काढणार आहे. याचा बाजारावर दबाव येऊ शकतो.
Chana Market
Chana MarketAgrowon
Published on
Updated on

Chana News : सरकारकडे आता हरभऱ्याचा जवळपास ३८ लाख टनांचा स्टाॅक झाला. हा स्टाॅक सरकार पुढील काळात बाहेर काढणार आहे. याचा बाजारावर दबाव येऊ शकतो. त्यामुळे व्यापारी सध्या कमी भावातच खरेदी करत आहेत. तसेच सरकारने २३ लाख टनांची खरेदी करूनही हरभरा भाव सध्या हमीभावापेक्षा ६०० ते ८०० रुपयांनी कमी दिसतात.

हरभरा बाजारात सध्या नाफेडच्या हरभरा विक्रीचा मुद्दा चर्चेला येत आहे. नाफेडची खेरदी आता २३ लाख टनांपर्यंत पोचली. विशेष म्हणजे नाफेडची खेरदी इतिहासातील दुसरी विक्रमी खरेदी झाली. पण बाजारात मात्र भाव ६०० ते ८०० रुपयाने कमी राहिले.

एकीकडे सरकार हमीभावाने खरेदी करते. पण दुसरीकडे सरकारच्याच खरेदीचा दबाव बाजारावर राहिला. नाफेडने मागील हंगामात हरभरा खरेदी करून हमीभावापेक्षा ६०० रुपयाने स्वस्त विकला. विशेष म्हणजे खुल्या बाजारातील दरापेक्षाही हा भाव कमी होता. परिणामी अनेक व्यापारी आणि स्टाॅकिस्ट अडचणीत आले होते.

गेले वर्षभर हरभरा भाव ४ हजार ५०० रुपयांच्या खालीच होते. काही वेळा तर भावाने ४ हजार २०० रुपयांचाही टप्पा गाठला होता. सरकारकडे गेल्यावर्षी २९ लाख टन हरभरा स्टाॅक होता. हा स्टाॅक कमी करण्यासाठी सरकारने खुल्या बाजारात विक्री केली. लिलिवातील भाव ४ हजारांपासून सुरु झाले होते.

हमीभावापेक्षा दर किमान ८०० रुपयाने कमी होते. राज्यांनाही रेशनवर वाटण्यासाठी स्वस्त दरात हरभरा देऊ केला. काही राज्यांनी स्वस्त हरभऱ्याची खेरदीही केली होती. याचा दबाव मात्र हरभरा दरावर येत गेला.

Chana Market
Chana Market : ‘नाफेड’च्या स्टॉकचा हरभरा बाजारावर दबाव

यंदाही सरकार हाच कित्ता गिरवेल, अशी भीती असल्याने व्यापारी आणि स्टाॅकिस्टनी हमीभावापेक्षा किमान ८०० रुपये कमी भावाने खरेदी केली. याचा फटका शेतकऱ्यांना बसला. हरभरा भाव ४ हजार ६०० ते ५ हजार रुपयांच्या दरम्यान आहेत.

सरकारच्या अंदाजनुसार यंदा देशात १३५ लाख टन हरभरा उत्पादन झाले. त्यापैकी नाफेडने २३ लाख टन खरेदी केली. शिल्लक ११२ लाख टन हरभरा शेतकऱ्यांना कमी भावात विकावा लागला.

सरकारकडे गेल्या हंगामातील १५ लाख टन हरभरा शिल्लक असल्याचे जाणकारांनी सांगितले. तर यंदा हंगामात २३ लाख टनांची खरेदी झाली. परिणामी सरकारकडे यंदा ३८ लाख टनांचा स्टाॅक झाला. हा स्टाॅक गेल्यावर्षीपेक्षा ८ ते ९ लाख टनांनी जास्त आहे. त्यामुळे यंदाही सरकारची हरभरा विक्री जास्त दिसू शकते.

याचा दबाव बाजारावर जाणवणार आहे. त्यामुळे पुढील काळातही सरकारच्या हरभरा विक्रीचा दबाव बाजारावर राहील. त्यामुळे हरभरा दरात चांगल्या वाढीची शक्यता धुसरच आहे, असे जाणकारांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com