CCI Stock: ‘सीसीआय’कडे कापसाचा ४६ टक्‍के साठा

Cotton Market: भारतीय कापूस महामंडळाकडून (सीसीआय) देशभरात एकूण आवकेपैकी ४६ टक्‍के कापसाची खरेदी करण्यात आल्याचे वृत्त आहे.
Cotton
CottonAgrowon
Published on
Updated on

Nagpur News: भारतीय कापूस महामंडळाकडून (सीसीआय) देशभरात एकूण आवकेपैकी ४६ टक्‍के कापसाची खरेदी करण्यात आल्याचे वृत्त आहे. त्यानुसार मोठ्या प्रमाणावर ‘सीसीआय’कडे कापसाची उपलब्धता असल्याने यंदाच्या हंगामात प्रक्रिया उद्योगासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या उपलब्धतेसाठी बाजाराची अवलंबिता पूर्णपणे सीसीआयवर राहणार असल्याचा दावा या पार्श्‍वभूमीवर केला जात आहे.

सीसीआयच्या केंद्रावर कापसाची आवक वाढती असल्याचे चित्र यंदाच्या हंगामात अनुभवण्यात आले. केंद्र सरकारने कापसासाठी २०२४-२५ या वर्षासाठी लांब धाग्याच्या कापसासाठी ७५२१ रुपये प्रति क्‍विंटलचा दर जाहीर केला होता. हंगामाच्या सुरुवातीला असलेल्या कापसाची स्टेपल लेंथ (......... ) २७.५ ते ३२ एमएम राहते.

Cotton
Cotton Import: कापूस आयात वाढून १२ लाख गाठींवर पोचली; निर्यात ७ लाख गाठींच्या दरम्यान स्थिरावली

या दर्जाच्या कापसाची हमीभावाने खरेदी करण्यावर सीसीआयचा भर होता. त्यानंतर जानेवारीपासून दुसऱ्या, तिसऱ्या वेच्यातील कापसाची स्टेपल लेंथ कमी होत जाते. त्यासोबतच त्यात कचऱ्याचे प्रमाणही वाढत राहते. त्यामुळे अशा कापसाला स्टेपल लेंथच्या प्रमाणानुसार प्रति क्‍विंटल १०० रुपये कमी दर दिला जातो. सध्या एच-४ मोडमधील कापसाची खरेदी केली जात असून, या दर्जाच्या कापसाला सीसीआयकडून ७४११ रुपयांचा दर दिला जात आहे.

खासगीत व्यापाऱ्यांकडून ७१५० रुपये क्‍विंटल दराने कापसाची खरेदी होत आहे. हिंगणघाट (वर्धा) बाजार समितीचा विचार करता या ठिकाणी कापसाची आवक ४८५ गाड्यांची होत आहे. यातील व्यापाऱ्यांद्वारे खरेदी होणाऱ्या कापसाला सद्यःस्थितीत ७१०० ते ७३३५ रुपये क्‍विंटलचा दर मिळत आहे. सीसीआयकडून या ठिकाणी कापसाला ७१२४ ते ७४२१ रुपये असा दर मिळत आहे.

Cotton
Cotton Rate: फुलंब्रीत कापसाला सरासरी ७३८१ ते ७४३१ रुपये क्विंटल दर; शेतकऱ्यांना दिलासा

अमरावती बाजार समितीअंतर्गंत होणाऱ्या सीसीआय खरेदीचा दर हिंगणघाट बाजार समितीमधील दरानुसार होता. अमरावती बाजार समिती अंतर्गत खासगी व्यापाऱ्यांकडून मात्र काहीसा सुधारित दर कापसाला देण्यात आला. या ठिकाणी व्यापाऱ्यांनी कापसाची खरेदी ७२०० ते ७५२५ रुपयांनी केली. विदर्भातील इतर बाजार समित्यांच्या तुलनेत या ठिकाणी चांगला दर मिळाला, असे सांगितले जाते.

दुसऱ्या, तिसऱ्या वेचणीचा कापूस असल्याने दर दबावात आले आहेत. ‘सीसीआय’कडून ७४११ रुपये क्‍विंटलचा दर दिला जात आहे. आमच्या शेतकरी कंपनीत गेल्या दीड महिन्यात ३५ हजार खासगी, तर २५ हजार क्‍विंटल सीसीआयकरिता कापसाची खरेदी करण्यात आली आहे.
बालाजी ढोबे, मुख्य कार्यकारी अधिकारी, कांचनी फार्मर प्रोड्यूसर कंपनी, वरोरा, चंद्रपूर
बाजारात १६० लाख गाठींची कापूस आवक झाली आहे. यातील ७२ लाख गाठी इतक्‍या कापसाची खरेदी ‘सीसीआय’कडून करण्यात आली आहे. त्यामुळे एकूण आवक झालेल्या कापसापैकी ४६ टक्‍के वाटा सीसीआयचा आहे. त्यामुळे सीसीआयची बार्गेनिंग पॉवर वाढणार आहे.
गोविंद वैराळे, कापूस विपणन क्षेत्राचे अभ्यासक
शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळावा याकरिता बाजार हस्तक्षेप योजनेअंतर्गत सीसीआयकडून खरेदी केली जात आहे. परंतु पहिल्या वेचणीनंतर, दुसऱ्या, तिसऱ्या वेचणीचा कापूस अपेक्षित दर्जाचा राहत नसल्याने निकषानुसार दर कमी होतात. देशात यंदा २९९ ते ३०० लाख गाठी इतक्‍या कापसाच्या उत्पादकतेचा अंदाज आहे.
ललितकुमार गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी, भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com