Cotton Rate: फुलंब्रीत कापसाला सरासरी ७३८१ ते ७४३१ रुपये क्विंटल दर; शेतकऱ्यांना दिलासा

Cotton Market Update: फुलंब्री येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये असलेल्या सीसीआयच्या कापूस खरेदी केंद्रावर १३ ते १९ जानेवारीदरम्यान कापसाची एकूण आवक ८४१३ क्विंटल झाली.
Cotton
CottonAgrowon
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar News: फुलंब्री येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये असलेल्या सीसीआयच्या कापूस खरेदी केंद्रावर १३ ते १९ जानेवारीदरम्यान कापसाची एकूण आवक ८४१३ क्विंटल झाली. या कापसाला सरासरी ७३८१ ते ७४३१ रुपये प्रतिक्विंटल दरम्यान दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली.

फुलंब्री बाजार समितीमध्ये सीसीआयच्या वतीने साधारणतः नोव्हेंबरमध्ये कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. या कापूस खरेदी केंद्रावर मध्यम स्टेपल कापसाची सातत्याने आवक होते आहे.

Cotton
CCI Cotton Procurement : ‘सीसीआय’ फेब्रुवारीत गुंडाळणार कापूस खरेदी

१३ ते १९ जानेवारीदरम्यान या केंद्रावर होणाऱ्या कापसाच्या आवकेत प्रचंड चढ-उतार पाहायला मिळाला २६९ ते २०९७ क्विंटल दरम्यान कमी-अधिक प्रमाणात आवक झालेल्या माध्यम स्टेपल कापसाला सरासरी ७३८१ ते ७४३१ रुपये प्रति क्विंटल दरम्यान दर मिळाला.

Cotton
Cotton Arrival: कापसाची बाजारातील आवक टिकून; दरावर दबाव कायम!

कापसाचा कमीत कमी दर ७१५० रुपये, तर जास्तीत जास्त दर ७५५० रुपये प्रति क्विंटल दरम्यान राहिल्याची माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली.

मक्याची ४२८४ क्विंटल आवक

कापसासोबतच मक्याची बाजार समितीमध्ये प्राधान्याने आवक होते. १३ ते १९ जानेवारी दरम्यान फुलंब्री बाजार समितीत मक्याची सुमारे ४२८४ क्विंटल आवक झाली. ४७३ ते ७०१ क्विंटल दरम्यान कमी-अधिक प्रमाणात आवक झालेल्या मक्याचे सरासरी दर २०२५ ते २१७५ रुपये प्रति क्विंटल दरम्यान राहिले. मक्याला कमीत कमी १९५०, तर जास्तीत जास्त २१७५ रुपये प्रति क्विंटल दरम्यान दर मिळाल्याचे बाजार समितीच्या वतीने कळविण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com