
फ्युचर्स किमतीः सप्ताह- ३१ मे ६ जून २०२५
१ ते ६ जून दरम्यान देशातील पाऊस सरासरीपेक्षा तीन टक्क्यांनी कमी झाला. महाराष्ट्रात तो ४८ टक्क्यांनी कमी झाला. कोकण वगळता इतर सर्व विभागात (मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भ) पाऊस कमी राहिला.
या सप्ताहात टोमॅटोची आवक मोठ्या प्रमाणावर वाढली. ही वाढ मुख्यत्वे आंध्र प्रदेश, कर्नाटक व महाराष्ट्रात होती. मुगाच्या उन्हाळी पिकाची आवकसुद्धा वाढली. यात मुख्यत्वे उत्तर प्रदेश व गुजरात यांचा सहभाग मोठा होता. पुढील काही दिवस ही आवक वाढती राहील. मुगाची मागणी मात्र टिकून आहे; पण बाजारभाव हमीभावापेक्षा बरेच कमी आहेत.
भारतात मूग हे महत्त्वाचे कडधान्य आहे. ते खरिपात व रब्बीत, बहुतेक सर्व राज्यांत घेतले जाते. देशातील मूग उत्पादनात राजस्थानचा पहिला क्रमांक लागतो. या राज्याचा उत्पादनात हिस्सा ४२ टक्के आहे. त्याखालोखाल मध्य प्रदेश (१९ टक्के) व महाराष्ट्र (७ टक्के) ही राज्ये आहेत. महाराष्ट्रात मुगाचे उत्पादन खरिपात घेतले जाते. देशातील बाजार समित्यांतील आवक उत्पादनाच्या २० ते २५ टक्के आहे.
उरलेला सर्व माल परस्पर व्यापाऱ्यांना विकला जातो. देशात राजस्थानातील मेरटा बाजार मुगासाठी महत्त्वाचा आहे. महाराष्ट्रात अहिल्यानगर व लातूर येथे मुगाची सर्वाधिक आवक होते. त्याशिवाय महाराष्ट्रातील इतर २०० बाजार समित्यांमध्ये मुगाची आवक नोंदली गेली आहे. देशात मुगाची आवक जून ते सप्टेंबर मध्ये सर्वाधिक होते. गेल्या तीन वर्षातील मुख्य हंगामातील (जून ते डिसेंबर) मुगाचे सरासरी बाजार-भाव असे होते:
वर्ष---मेरटा---अहिल्यानगर---लातूर---हमीभाव
२०२२---६,०२७---५,८७७---६,४९८---७,७५५
२०२३---७,२१७---७,६२५---८,५७९---८,५५८
२०२४---६,८७२---७,२१३---७,२४४---८,६८२
लातूर मधील २०२३ मधील भाव वगळता तीनही बाजारात सर्व वर्षी बाजारभाव हमीभावापेक्षा कमी होते. सध्या मेरटा मधील भाव रु. ७,७०० आहे. ६ जून २०२५ रोजी संपलेल्या सप्ताहात किमतींमधील सविस्तर चढ-उतार खालील प्रमाणे आहेत.
कापूस/कपाशी
MCX मधील कापसाचे स्पॉट भाव (राजकोट, यवतमाळ, जालना) या सप्ताहात ०.२ टक्के घसरून रु. ५४,०८० वर आले आहेत. जुलै फ्युचर्स भाव सुद्धा १.५ टक्के घसरून रु. ५३,६०० वर आले आहेत. सप्टेंबर भाव रु. ५६,००० वर आलेले आहेत. ते स्पॉट भावापेक्षा ३.६ टक्के अधिक आहेत. अमेरिकेतील कापसाचे भाव या सप्ताहात स्थिर राहिले.
NCDEX मधील कपाशीचे स्पॉट भाव (राजकोट, प्रति २० किलो, २९ मिमी) गेल्या सप्ताहात रु. १,४७८ वर आले होते. या सप्ताहात ते रु. १,५०७ वर आले आहेत. नोव्हेंबर फ्युचर्स १.९ टक्क्यांनी वाढून रु. १,५५५ वर आले आहेत. ते स्पॉट भावापेक्षा ३.१ टक्के अधिक आहेत. एप्रिल फ्युचर्स रु. १,५९० वर आले आहेत.
कापसाचे या वर्षासाठी हमीभाव मध्यम धाग्यासाठी प्रति क्विंटल रु. ७,७१० व लांब धाग्यासाठी रु. ८११० आहेत. सध्याचे स्पॉट व फ्युचर्स भाव हमीभावापेक्षा कमी आहेत.
मका
NCDEX मधील खरीप मक्याच्या स्पॉट किमती (गुलाबबाग) गेल्या सप्ताहात रु. २,२२२ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या रु. २,२२० वर आल्या आहेत. जुलै फ्युचर्स किमती रु. २,२३७ वर आल्या आहेत. ऑक्टोबर फ्युचर्स रु. २,२७४ वर आहेत. स्पॉटपेक्षा हा भाव २.४ टक्क्यांनी अधिक आहे. मक्याचा हमीभाव रु. २,४०० आहे. सध्याचे स्पॉट व फ्युचर्स भाव हमीभावापेक्षा कमी आहेत.
हळद
NCDEX मधील हळदीच्या स्पॉट किमती (निजामाबाद, सांगली) गेल्या सप्ताहात ०.४ टक्के वाढून रु. १४,४४७ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या ०.४ टक्के वाढून रु. १४,५६४ वर आल्या आहेत. ऑगस्ट फ्युचर्स किमती ०.८ टक्के वाढून रु. १४,९१० वर आल्या आहेत. ऑक्टोबर किमती रु. १५,०६४ वर आल्या आहेत. स्पॉट भावापेक्षा त्या ३.४ टक्के अधिक आहेत. सांगली मधील (राजापुरी) स्पॉट भाव ४.३ टक्क्यांनी वाढून रु. १६,१५९ वर आला आहे.
हरभरा
हरभऱ्याच्या स्पॉट किमती (अकोला) गेल्या सप्ताहात ०.९ टक्के वाढून रु. ५,८५० वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या घसरून रु. ५,८०० वर आल्या आहेत. हरभऱ्याचा हमीभाव रु. ५,६५० आहे. बाजारभाव हमीभावापेक्षा अधिक आहे.
मूग
मुगाची स्पॉट किंमत (मेरटा) ६.९ टक्के वाढून रु. ७,७०० वर आली आहे. मुगाचा हमीभाव रु. ८,७६८ जाहीर झाला आहे. सध्याचा भाव हमीभावापेक्षा कमी आहे. नवीन पिकाची आवक वाढती आहे.
सोयाबीन
गेल्या सप्ताहात सोयाबीनची स्पॉट किंमत (अकोला) रु. ४,३४३ वर आली होती. या सप्ताहात ती ०.६ टक्के वाढून रु. ४,३६८ वर आली आहे. सोयाबीनचा हमीभाव रु. ५,३२८ आहे. नवीन पिकाची आवक आता कमी होऊ लागली आहे. हमीभावापेक्षा बाजारभाव कमी आहे. अमेरिकेतील सोयाबीनचे भाव या सप्ताहात ०.३ टक्के वाढले.
तूर
गेल्या सप्ताहात तुरीची स्पॉट किंमत (अकोला) रु. ६,७५८ वर आली होती. या सप्ताहात ती पुन्हा घसरून रु. ६,४९० वर आली आहे. तुरीचा हमीभाव रु. ८,००० आहे. आवक कमी होऊ लागली आहे. सध्याचा भाव हमीभावापेक्षा कमी आहे.
कांदा
कांद्याची (पिंपळगाव) किंमत या सप्ताहात या सप्ताहात वाढून रु. १,४९६ वर आली आहे. कांद्याची आवक या सप्ताहात पुन्हा वाढली.
टोमॅटो
गेल्या सप्ताहात टोमॅटोची स्पॉट किंमत (जुन्नर, नारायणगाव) रु. १,७०० वर आली होती. या सप्ताहात ती वाढत्या आवकेमुळे घसरून रु. १,३९५ वर आली आहे.
(सर्व किमती प्रति क्विंटल; कापसाची किंमत प्रति खंडी (३५५.५६ किलो); कपाशीची किंमत प्रति २० किलो.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.