Bedana Market : बेदाण्याला मागणीमुळे दर टिकून

Bedana Rate : यंदाचा बेदाणा निर्मितीचा हंगाम एक महिना अगोदर सुरू झाला असता तरी बाजारात नव्या बेदाण्याची आवक कमी-अधिक प्रमाणात आहे.
Bedana Market
Bedana MarketAgrowon
Published on
Updated on

Sangli News : यंदाचा बेदाणा निर्मितीचा हंगाम एक महिना अगोदर सुरू झाला असता तरी बाजारात नव्या बेदाण्याची आवक कमी-अधिक प्रमाणात आहे. परंतु गत हंगामातील बेदाणा आणि यंदाच्या हंगामातील बेदाण्याला मागणी आहे.

त्यामुळे दर्जेदार बेदाण्याला प्रतिकिलो १२० ते २१० रुपये असा दर मिळत आहे. गेल्या महिन्यापासून बेदाण्याचे दर टिकून आहेत. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून नव्या बेदाण्याची आवक सुरू होईल, अशी माहिती बेदाणा उद्योगातील जाणकारांनी दिली.

राज्यात ३१ डिसेंबरअखेर सध्या राज्यात ४० हजार टन बेदाणा शिल्लक होता. त्यानंतर बाजारात बेदाण्याला चांगली मागणी असल्याने बेदाण्याचा उठाव झाला. आजमितीस अंदाजे १० हजार टन बेदाणा शिल्लक राहिला असून येत्या पंधरा ते वीस दिवसांत गतवर्षीचा बेदण्याची विक्री होईल, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.

Bedana Market
Bedana Shed Subsidy : बेदाणाशेडच्या योजनेचे अनुदान वाढवा

दरम्यान, यंदाचा बेदाणा निर्मिताचा हंगाम एक महिना अगोदर सुरू झाला आहे. परंतु द्राक्ष विक्री करून शिल्लक राहिलेल्या द्राक्षापासून बेदाणा तयार होत आहे. हा बेदाणा बाजारपेठेत विक्रीस येत आहे. तासगाव, सांगली, पंढरपूर या बाजार समितीत सुमारे २०० टन नवा बेदाणा विक्रीस येत आहे. त्याचबरोबर गत हंगामातील बेदाणाही विक्रीस येत आहे.

Bedana Market
Bedana Season : बेदाणा निर्मिती हंगामाला महिनाभर अगोदरच सुरुवात

जानेवारीपासून बेदाण्याचा उठाव होत असून दर्जेदार बेदाण्याला प्रतिकिलो १२० ते २१० रुपयांचा दर मिळत आहे. मध्यंतरी नवा बेदाणा मार्केटमध्ये विक्रीला आला असला तरी, बेदाण्याचे दर टिकून होते. त्यामुळे हंगामाच्या प्रारंभापासून बेदाण्याला दर चांगले मिळत असल्याने बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

फेब्रुवारीअखेर नव्या बेदाण्याची आवक वाढेल

तास-ए-गणेश, माणिक चमन, क्‍लोन टू, सोनाका या वाणांपासून बेदाणा तयार केला जातो. सध्या या वाणांपासून बेदाणा तयार करण्याची लबगब सुरू झाली आहे. त्यामुळे फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून बेदाण्याची आवक वाढेल. बेदाणा आवक आणि विक्रीचा खरा हंगाम मार्चमध्ये सुरू होतो. त्यानुसार बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांनी बेदाणा निर्मितीसाठी नियोजन केले आहे.

यंदाचा बेदाणानिर्मितीचा हंगाम सुरू झाला असून आवक कमी अधिक होत आहे. जुन्या बेदाण्याचा उठाव होत असून बेदाण्याचे दर टिकून आहेत.
- सुशील हडदरे, बेदाणा व्यापारी, सांगली

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com