Bedana Market
Bedana MarketAgrowon

Bedana Shed Subsidy : बेदाणाशेडच्या योजनेचे अनुदान वाढवा

Bedana Shed Scheme : श्री. गेडाम दोन दिवसाच्या सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यांनी माढा, उत्तर सोलापूर, मंगळवेढ्यातील काही प्रयोगशील शेतकऱ्यांच्या शेतीला भेटी दिल्या.
Published on

Solapur News : बेदाणा शेडच्या अनुदानात वाढ करा, प्रक्रिया उद्योगाला अनुदान वाढवून द्या, कांद्याच्या घसरत्या दरावर उपाय करा, माळढोक अभयारण्याच्या परिसरातील शेतीला रानडुकरांचा मोठ्या प्रमाणात त्रास होतोय, त्यावर प्रतिबंध करा, यासारख्या व्यथा कृषी आयुक्त प्रवीण गेडाम यांच्यासमोर शनिवारी (ता.३) शेतकऱ्यांनी मांडल्या. त्या योग्य पद्धतीने समजून घेऊन, त्यावर काय उपाय आहे, अशी विचारणा करताना, आपणही त्याचा अभ्यास करू आणि योग्य तो मार्ग काढू, असे आश्वासन गेडाम यांनी दिले.

श्री. गेडाम दोन दिवसाच्या सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यांनी माढा, उत्तर सोलापूर, मंगळवेढ्यातील काही प्रयोगशील शेतकऱ्यांच्या शेतीला भेटी दिल्या. काही शेतकरी कंपन्यांच्या उत्पादनांची माहिती घेतली. विभागीय कृषी सहसंचालक रफिक नाईकवाडी, ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक मदन मुकणे, उपविभागीय अधिकारी भारत कटके आदी या वेळी उपस्थित होते.

Bedana Market
Bedana Market : सांगली, तासगावच्या बाजारात नव्या बेदण्याची आवक

शनिवारी त्यांनी नान्नजचे दत्तात्रेय काळे यांच्या द्राक्षशेतीला भेट दिली. काळे यांनी विकसित केलेल्या विविध वाणांची आणि त्यांच्या गुणवैशिष्ट्यांची माहिती गेडाम यांनी घेतली. तसेच नव्याने तयार केलेल्या किंगबेरी वाणाचीही आवर्जून विचारणा केली. त्यानंतर बेदाणाशेडची पाहणी केली.

Bedana Market
Bedana Market : लिलावाच्या मुहूर्ताला नव्या बेदाण्याला सरासरी १७० रुपये दर

बेदाणा शेडच्या उभारणीला ३५ टक्के अनुदान आहे, पण सध्याच्या महागाईच्या काळात ते कमी आहे. द्राक्षाचे एकूण उत्पादन आणि बेदाण्याच्या मूल्यवर्धनातून निर्माण झालेले मार्केट विचारात घेता, बेदाणा मार्केटला मोठा वाव मिळू शकतो, हे त्यांच्या निदर्शनास आणण्यात आले.

त्याशिवाय उत्तर सोलापूर परिसरात रानडुकरांचा शेतपिकांना मोठा त्रास होतो, याबाबत काही शेतकऱ्यांनी माहिती दिली. गेडाम यांनी निमगाव येथील विठ्ठलगंगा फार्मर्स प्रोड्युसर कंपनीलाही भेट दिली. पॅक हाउस आणि कोल्ड स्टोअरेजच्या विभागाची पाहणी केली.

‘कांद्याचा नजरअंदाज अहवाल योग्य हवा’

कांद्याचे दर घसरलेले आहेत, हे वारंवार घडते, याकडे लक्ष वेधताना मूळात कांद्याच्या क्षेत्राबाबत नजरअंदाज घेताना चुकीची माहिती दिली जाते. कांद्याचे नेमके क्षेत्र किती आणि किती कांदा बाजारात येणार याचा अंदाज येत नसल्यानेच दर कोसळतात.

त्यासाठी गावपातळीवर नजरअंदाज अहवाल योग्य पद्धतीने तयार व्हायला हवा, असा मुद्दा गेडाम यांच्यासमोर मांडण्यात आला. तेव्हा त्याबाबत त्यात काय बदल करता येतील का, हे पाहू, असे आश्वासन त्यांनी दिले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com