Nashik News : द्राक्ष हंगामाचा श्रीगणेशा होण्यापाठोपाठ बेदाणा निर्मितीलाही पिंपळगाव बसवंतसह परिसरात सुरुवात झाली. हंगामातील नव्या बेदाण्याच्या लिलावाचा पिंपळगाव बसवंत बाजार समितीत प्रारंभ झाला. नव्या बेदाण्याला लिलावाच्या मुहूर्तावर प्रतिकिलो ३५५ रुपये किलो भाव मिळाला. तर सरासरी १७० रुपये दर मिळाला. मुहूर्ताला २० टन नव्या बेदाण्याची आवक झाली.
कांदा, टोमॅटोप्रमाणेच बेदाण्याची बाजारपेठ अशी पिंपळगाव बसवंत बाजार समितीची ओळख निर्माण झाली आहे. द्राक्षाचे मूल्यवर्धित उत्पादन असलेल्या बेदाण्याच्या व्यापारात पिंपळगाव बाजार समितीत बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. त्यामुळे बेदाणा उत्पादन व उलाढालाची आलेख उंचावत आहे.
यंदा नव्या बेदाण्याच्या लिलावाचा प्रारंभ बाजार समितीचे सभापती आमदार दिलीप बनकर यांच्या हस्ते झाला. बनकर यांच्या हस्ते पुजाविधी करून मुहूर्ताच्या बेदाण्याला प्रतिकिलो ३५५ रुपये दर मिळाला. बेदाणा उत्पादक जुबेर कुरेशी यांचा बेदाणा व्यापारी अंशु सोनी यांनी मुहूर्तावर खरेदी केला. तर किमान १००, कमाल ३५५ तर सरासरी १७० रुपये भाव नव्या बेदाण्याला मिळाला.
पिंपळगावचा पिवळा बेदाणा गेल्या दहा वर्षांत सातासमुद्रापार पोहोचत आहे. यंदा अद्याप परदेशातून मागणी आलेली नाही. सण, उत्सव येत असल्याने बेदाण्याची मागणी वाढून दर सुधारतील अशी शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.
मुहूर्ताच्या लिलावाप्रसंगी बाजार समितीचे संचालक शंकरलाल ठक्कर, माजी संचालक बाबासाहेब शिंदे, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष शितलकुमार भंडारी, स्नेहलकुमार शाह, शांतिलाल चोरडिया,चंद्रकांत राका, महेंद्र ओस्तवाल, बंडू कुलथे, जयप्रकाश चोरडिया, सुशील दीक्षित, आतिष कोचर, योगेश ठक्कर, प्रमोद राठी, राजेंद्र घुमरे, आकाश कोचर, अतिष भंडारी, इकबाल कुरेशी आदी उपस्थित होते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.