Banana Plantation : जळगाव जिल्ह्यात केळी कंदांचे दर स्थिर

Banana Seed : कंदांचा मुबलक पुरवठा खानदेशात सध्या होत आहेत. शेतकरी ग्रॅण्ड नैन वाणाच्या बागांतील कंद लागवडीसाठी अधिकचे उपयोगात आणत आहेत.
Banana
Banana Agrowon

Jalgaon News : जिल्ह्यात केळीची लागवड सुरूच आहे. त्यासाठी कंदांची मागणी अधिक असून, त्यांचे दरही स्थिर आहेत. कंदांचा मुबलक पुरवठा खानदेशात सध्या होत आहेत. शेतकरी ग्रॅण्ड नैन वाणाच्या बागांतील कंद लागवडीसाठी अधिकचे उपयोगात आणत आहेत. लागवडीसाठी उतिसंवर्धित केळी रोपांच्या बागेतील कंदांना अधिक मागणी आहे.

केळीचे कंद सध्या जळगाव जिल्ह्यातील रावेर, यावल, मुक्ताईनगर, चोपडा, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारमधील शहादा, तळोदा या भागांत उपलब्ध आहेत. काही शेतकरी जळगावातील जामनेर, छत्रपती संभाजीनगरमधील सोयगाव, कन्नड भागांतूनही कंद आणत आहेत.

Banana
Banana Rate : खानदेशात केळी दरात मोठी घसरण

मृग बहर हंगामातील आगाप केळीची लागवड सध्या सुरू आहे. उष्णता अधिक असल्याने अनेकांनी क्रॉप कव्हर व धैंचाचे पीक रोपांभोवती वाढवून लागवड केली आहे. यामुळे पिकाचे उष्णतेपासून संरक्षण होत आहे. तसेच लागवडही सुरूच आहे. केळी कंदांचे दर प्रतिकंद दोन ते चार रुपये असे आहेत.

Banana
Banana Sunburn : उष्णतेमुळे खानदेशातील केळीपट्टा होरपळला

काळ्या कसदार केळी कंद लागवडीसाठी मध्यम जमिनीतील बागांमधील कंद आणले जात आहेत. तर मध्यम, हलक्या जमिनीत लागवडीसाठी काळ्या कसदार जमिनीतील कंद आणले जात आहेत. चांगली लाली, कडकपणा व मध्यम आकारातील कंद लागवडीसाठी उपयोगात आणले जात आहेत. अनेक शेतकरी नंदुरबार जिल्ह्यातील सातमासी, आंबेमोहोर आदी पारंपरिक वाणही लागवडीसाठी आणत आहेत.

लागवड कमी करून व्यवस्थापनावर भर

खानदेशात सध्या केळीची लागवड रावेर, यावल, मुक्ताईनगर, चोपडा, जळगाव, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारातील शहादा, तळोदा भागात सुरू आहे. यंदा लागवड स्थिर राहील. कारण, केळीचे दर फारसे नाहीत. तसेच केळीची लागवड वाढविण्याऐवजी कमी लागवड करून चांगले व्यवस्थापन, खर्च करण्यावर शेतकऱ्यांचा भर आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com