Banana Rate : खानदेशात केळी दरात मोठी घसरण

Banana Market : खानदेशात केळी दरात मागील आठवड्यात आणखी मोठी घट झाली आहे. दर ४०० ते ५०० रुपये प्रतिक्विंटल, असे असून, जाहीर दरांपेक्षा कमी दरात केळी खरेदीचा आरोप शेतकरी करीत आहेत.
Banana Market
Banana MarketAgrowon

Jalgaon News : खानदेशात केळी दरात मागील आठवड्यात आणखी मोठी घट झाली आहे. दर ४०० ते ५०० रुपये प्रतिक्विंटल, असे असून, जाहीर दरांपेक्षा कमी दरात केळी खरेदीचा आरोप शेतकरी करीत आहेत.

केळीला जाहीर दरांपेक्षा कमी दर मिळत असल्याने तक्रारी वाढल्या. या बाबत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी बैठक घेऊन आढावा घेतला. तसेच जे दर रावेर व अन्य बाजार समित्या केळीसंबंधी जाहीर करीत आहेत, त्या दरात केळीची खरेदी करण्यात यावी, अन्यथा खरेदीदारांवर कारवाईची तंबी देण्यात आली आहे.

Banana Market
Banana Farming Management : सिंचन, खत व्यवस्थापनावर भर

केळीची मोठी आवक खानदेशात होत असून, मागील हंगामाच्या तुलनेत ही आवक ३० टक्के अधिक आहे. यातच निर्यात कमी होत आहे. सध्या आंबा अन्य हंगामी फळे दाखल होत आहेत. तसेच खानदेशातील केळीची मोठी बाजारपेठ असलेल्या उत्तर भारतात गुजरात, मध्य प्रदेशातूनही केळीची पाठवणूक केली जात आहे.

सध्या मालवाहतुकीसाठी कंटेनर उपलब्ध होत नसल्याने आखातात फारशी केळी पाठविली जात नसल्याची स्थिती आहे. परदेशातील केळीची पाठवणूक कमी असल्याने हवी तशी पोकळी स्थानिक बाजारात केळीसंबंधी तयार होत नाही. केळीची आवक वाढत आहे. दुसरीकडे एक दिवसदेखील देशातील एखाद्या भागातील केळीची मागणी कमी राहिल्यास दरांवर दबाव वाढतो.

Banana Market
Banana rate: केळीचे दरही दोन हजार रुपयांवर टिकून

मध्यंतरी काश्मिरातील मागणी पाऊस व तेथील वादळाच्या स्थितीने कमी झाली. यामुळे केळीची मागणी खानदेशात कमी झाली. दिल्ली व अन्य बाजारांतूनही केळीची मागणी कमी आहे. पुरवठा अधिक आहे. केळीचे दर ११०० ते १२०० रुपये प्रतिक्विंटल, असे जाहीर होत आहेत. परंतु दर्जेदार केळीसही ५०० ते ७०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळत आहे.

केळीचे दर जळगाव जिल्ह्यातील रावेर, चोपडा या बाजार समित्या जाहीर करतात. परंतु जे दर जाहीर होतात, त्या दरात केळीची खरेदी होत नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे प्रशासनाने बैठक घेऊन याबाबत भरारी पथके, दरांची अंमलबजावणी या बाबत कार्यवाहीच्या सूचना दिल्या आहेत. कमी दराच्या केळीचे दर ३०० ते ४०० रुपये प्रतिक्विंटल, असे आहेत. मध्य प्रदेशातही केळीची आवक वाढली असून, तेथील बऱ्हाणपुरातही रोज २०० ते १९० ट्रक केळीची आवक होत आहे.

आवक ३०० ट्रकपेक्षा अधिक

केळीची आवक खानदेशात सध्या रोज ३६० ट्रक (एक ट्रक १६ टन क्षमता) एवढी आहे. जळगाव जिल्ह्यातील आवक ३०० ट्रकपेक्षा अधिक आहे. एकट्या रावेर, यावल व मुक्ताईनगर भागातील आवक २५० ते २५५ ट्रक एवढी आहे. दर्जेदार केळी या भागात येत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com