Banana Market : केळी दरात मार्गशीर्ष महिन्यात तेजीची शक्यता

Banana Rate : सध्‍या केळीचे दर समाधानकारक आहेत. देशांतर्गत बाजारात केळीला १६००० ते १७५०० रुपयापर्यंत दर मिळत आहेत.
Banana Market Update
Banana Market Update Agrowon

Kolhapur News : सध्‍या केळीचे दर समाधानकारक आहेत. देशांतर्गत बाजारात केळीला १६००० ते १७५०० रुपयापर्यंत दर मिळत आहेत. तुलसी विवाहानंतर असणारे विवाह मुहूर्त व पुढील पंधरवड्यात सुरू होणारा मार्गशीर्ष महिना यामुळे येत्‍या काही दिवसांत केळीच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

गेल्‍या सहा महिन्यांपासून राज्यात केळीचे उत्पादन कमी झाले आहे. कोरोनानंतर केळीचे भाव कमी झाल्याने जळगावचा केळी पट्टा वगळता राज्याच्या अन्य भागांत केळी लागवड कमी झाली. गेल्या सहा महिन्यांत तर दुष्काळी परिस्‍थितीमुळे अनेक शेतकऱ्यांनी केळी लागवडीकडे दुर्लक्ष केले.

Banana Market Update
Banana Orchard Management : वाढत्या थंडीचा केळी बागेवर काय परिणाम होतो?

सोलापूर वगळता पश्चिम महाराष्‍ट्रात उसाखालोखाल केळी पीक घेणाऱ्या भागामध्येही केळी लागवड घटली. यामुळे केळी व्यापाऱ्‍यांना स्‍थानिक ठिकाणी केळी उपलब्ध करतानाही मोठी अडचण निर्माण झाली. शंभर दोनशे किलोमीटरवरून केळी विक्रीसाठी येत असल्याचे चित्र पश्चिम महाराष्ट्रातील बाजारपेठांमध्ये होते.

गेल्या सहा महिन्यांपासून केळीचे दर वाढलेले आहेत. विशेष म्हणजे फारशी मागणी नसतानाही दरात फारशी घसरण झाली नाही. जेवढी दररोज बाजारात केळी लागतात तितकी केळीही उपलब्ध होत नसल्याने केळीचे दर सातत्याने १५००० रुपये टनांच्या वर टिकून आहेत. ज्या भागात पाण्‍याची मुबलक सोय आहे ते शेतकरीच केळीला प्राधान्य देत आहेत. यामुळे केळी असणाऱ्‍या ठराविक शेतकऱ्यांकडे सातत्याने विविध व्‍यापाऱ्‍यांकडून मागणी येत आहे.

दसऱ्‍यापर्यंत असणारा १५००० रुपयांचा दर दिवाळीच्या दरम्‍यान १८००० ते १९००० रुपयांपर्यंत गेला. दिवाळीच्या अगोदर चार दिवसांपर्यंत केळीचे दर वाढत होते. लक्ष्‍मीपूजनासाठी केळीला महत्त्व असते.

Banana Market Update
Banana Orchard : देशी केळी बागेने दिला आर्थिक आधार

यामुळे या कालावधीत केळीला मागणी असते. दिवाळीनंतर वाढलेले दर काहीसे कमी झाले. पण दिवाळीपूर्वीच्या सरासरी दरावर सध्या दर स्‍थिर आहेत. बाजारात केळी नसल्याने एकदम दर खाली येणार नाहीत, अशी शक्‍यता व्यापारी सूत्रांनी व्यक्‍त केली. येणाऱ्या काळात लग्न मुहूर्त व मार्गशीर्ष महिन्यामुळे दर वाढण्याची शक्यता आहे.

सध्या परिसरात केळी फारशी उपलब्ध नाहीत यामुळे आम्हाला बाहेरच्या जिल्‍ह्यांतून केळी मागवावी लागत आहेत. गेल्‍या पंधरवड्यापासून दर स्थिर आहेत.
- अविनाश पाटील, केळी रायपनिंग चेंबर चालक, मजले जि. कोल्हापूर
दिवाळीच्या दरम्यान दरात चांगली वाढ झाली होती. त्या तुलनेत सध्या दर काहीसे कमी असले तरी येणाऱ्या मार्गशीर्ष महिन्यामुळे केळी दरात वाढ होईल, अशी अपेक्षा आहे.
राजू मंगसुळे, केळी उत्पादक, औरवाड, ता. शिरोळ, जि.कोल्‍हापूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com