Banana Orchard Management : वाढत्या थंडीचा केळी बागेवर काय परिणाम होतो?

Banana Orchard : कमी तापमानाचा केळी बागेच्या वाढीवर आणि घडाची गुणवत्ता व उत्पादनावर विपरीत परिणाम दिसून येतो.
Banana Management
Banana ManagementAgrowon

Banana Crop : काही दिवसत थंडीचा कडाका वाढेल. काही ठिकाणी १० अंश सेल्सिअस पेक्षाही कमी तापमान नोंदवले जाते.  या कमी तापमानाचा केळी बागेच्या वाढीवर आणि घडाची गुणवत्ता व उत्पादनावर विपरीत परिणाम दिसून येतो. सध्या जून लागवडीतील मृग बागा शाकीय वाढीच्या अवस्थेत आहेत. तर नुकतीच लागवड झालेली कांदेबागेची झाडे स्थिरावून वाढीचा वेग घेण्याच्या अवस्थेत आहेत.

काही भागांत फेब्रुवारी-मार्च महिन्यात केळी लागवड होते. अशा बागा सध्या घड काढण्याच्या अवस्थेत आहेत. थंडीचा केळी पिकाच्या वाढीच्या सर्वच अवस्थांवर काय परिणाम होतात याविषयीची जळगाव येथील केळी संशोधन केंद्रातील तज्ज्ञांनी दिलेली माहिती पाहुया.

केळी बागेवर थंडीचे काय दुष्परिणाम होतात?

- झाडाला नवीन मुळ्या येण्याचा आणि त्यांच्या वाढीचा वेगही मंदावतो. त्याचा परिणाम मुळांच्या अन्नद्रव्य व पाणी शोषणाच्या क्षमतेवर होतो.

- दिवस व रात्रीच्या तापमानात मोठी तफावत असेल तर मुळांचे कंकण सडते. मुळांना इजा होऊन कार्यक्षम मुळ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट येते. याचा एकत्रित परिणाम केळी झाडाच्या वाढीवर होतो.

- पानांच्या निर्मिती आणि वाढीवर परिणाम होतो. केळी झाडास सर्वसाधारणपणे प्रति महिना ४ नवीन पाने येतात. परंतु थंडीच्या काळात हा दर कमी होऊन सरासरी २ ते ३ पानांवर येतो.

Banana Management
Grape Orchard : वाढत्या तापमानाचा द्राक्ष बागेवर होणार परिणाम

- थंडीमुळे नवीन पानांची पुंगळी उलगडण्यास वेळ लागतो. अनेक वेळा पानाच्या एका कडेजवळ (उलगडणाऱ्या पुंगळीची बाहेरील बाजू) कमी तापमानामुळे चट्टे तयार होतात.

- मुळ्यांद्वारे अन्नद्रव्ये शोषण क्षमता कमी झाल्यामुळे पाने जवळजवळ येतात. पानांचा गुच्छ तयार झाल्याप्रमाणे दिसते. पाने जवळ आल्याने पानांचा खूपच कमी भाग सूर्यप्रकाशाच्या थेट संपर्कात येतो. त्यामुळे प्रकाश संश्‍लेषण क्रिया मंदावते. परिणामी, झाडाची वाढ मंदावते.

पानांतील हरितद्रव्ये नष्ट होऊन पानांवर जांभळट रंगाची झाक तयार होते. नंतर पाने काळपट पडून करपतात. अन्नद्रव्यांचे शोषण व वहन योग्यरित्या न झाल्यास पाने पिवळसर होतात.

- मुळांची घटलेली कार्यक्षमता आणि नवीन पाने येण्याचा मंदावलेला वेग यामुळे घड निसवण्याच्या अवस्थेतील बागांमध्ये केळफूल बाहेर पडण्यास उशीर होतो.

- बागांमधील झाडांची एकाचवेळी निसवण होत नाही. त्यामुळे निसवण कालावधी लांबतो. बऱ्याच वेळा निसवण सामान्यपणे न होत खोड फोडून घड बाहेर येतो.

असा घड व्यवस्थित पोसत नाही कमकुवत राहतो. असे घड विक्री योग्य राहत नाही. कडाक्याची थंडी दीर्घकाळ राहिल्यास झाडे वांझ राहण्याचे प्रमाणदेखील वाढते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com