Banana Market : केळीचे दर अस्थिर; रोज ५०० ट्रकची आवक

Banana Rate : खानदेशात केळीची आवक कायम आहे. रोज ५०० ट्रक (एक ट्रक १६ टन क्षमता) केळीची आवक होत असून, दर अस्थिर आहेत.
Banana Market
Banana MarketAgrowon
Published on
Updated on

Jalgaon News : खानदेशात केळीची आवक कायम आहे. रोज ५०० ट्रक (एक ट्रक १६ टन क्षमता) केळीची आवक होत असून, दर अस्थिर आहेत. अन्य राज्यांतूनही केळीची उत्तरेकडे पाठवणूक सुरू असल्याने मोठी स्पर्धा खानदेशी केळीसमोर आहे. परिणामी दरात फारशी वाढ दिसत नसल्याची स्थिती आहे.

केळी दर सध्या ७००, ८०० ते १००० रुपये प्रतिक्विंटल आहेत. मागील महिन्यात हे दर ४००, ५०० ते ८०० रुपये प्रतिक्विंटल होते. परंतु दराबाबत प्रशासनाने हस्तक्षेप केला. व्यापाऱ्यांना तंबी दिली. यानंतर केळी दरात किंचित सुधारणा झाली. परंतु यानंतर केळी दरात फारशी सुधारणा झालेली नाही. कारण केळीची आवकही अधिक आहे.

Banana Market
Banana Rate : खानदेशात केळी दराचा प्रश्न कायम

खानदेशात सध्या रोज ५०० ट्रक केळीची आवक होत असून, एकट्या जळगाव जिल्ह्यात ४०० ट्रक आवक आहे, तर धुळे व नंदुरबारात मिळून १०० ते ११० ट्रक आवक होत आहे. नंदुरबारमधील शहादा, तळोदा भागात आवक आहे. दर्जेदार केळीची आवक सध्या आहे. परंतु दर कमी असल्याने शेतकऱ्यांचे वित्तीय नुकसान होत आहे.

Banana Market
Onion Banana Production : कांदेबाग, केळी उत्पादनाला मोठा फटका बसणार

जळगाव जिल्ह्यात रावेर, यावल, मुक्ताईनगरात मिळून रोज ३५० ट्रक केळीची आवक होत आहे. तर जामनेर, पाचोरा, भडगाव, जळगाव भागातही काहीशी आवक आहे. काश्मीरमध्ये पाठवणुकीच्या केळीचे दर ११०० रुपयांपर्यंत आहेत. तर अन्य भागातील पाठवणुकीच्या केळीचे दर मात्र कमी आहेत. कमी दर्जाच्या केळीला ४०० ते ५०० रुपये प्रतिक्विंटलचा दर आहे.

अन्य राज्यांतील केळीचीही आवक

अन्य राज्यांतील केळीची आवकही सुरू असून, तिची पाठवणूकही उत्तर भारतात सुरू आहे. खानदेशातील केळीची मोठी बाजारपेठ उत्तरेकडे म्हणजेच दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, पंजाब, काश्मीर येथे आहे. याच भागात मध्य प्रदेश, गुजरातमधून केळीची पाठवणूक सुरू आहे. यामुळे स्पर्धा तयार झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com