Banana
Banana Agrowon

Banana Rate : खानदेशात केळी दराचा प्रश्न कायम

Banana Market : खानदेशात जाहीर दरापेक्षा कमी दरात केळीच्या खरेदीचा प्रकार सुरूच आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या तक्रारी वाढल्या असून, यासंबंधी वरिष्ठ कार्यालये, प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी पुढे येत आहे.
Published on

Jalgaon News : खानदेशात जाहीर दरापेक्षा कमी दरात केळीच्या खरेदीचा प्रकार सुरूच आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या तक्रारी वाढल्या असून, यासंबंधी वरिष्ठ कार्यालये, प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी पुढे येत आहे.

Banana
Banana Crop Advisory : केळी पीक सल्ला

महिनाभरापासून केळीच्या कमी दराचा प्रश्न आहे. या महिन्याच्या सुरुवातीला जिल्हा प्रशासनाने केळीच्या कमी दरांबाबत शेतकरी, बाजार समिती, काही खरेदीदार आदींची बैठक रावेरात घेतली होती. यात व्यापाऱ्यांनी खरेदी केलेल्या केळीसंबंधीची दप्तर तपासणीचे आदेश देण्यात आले. तसेच कमी दरात केळी खरेदीसंबंधी कारवाईच्या सूचनाही दिल्या.

त्या वेळेस केळीचे दर ४०० ते ५०० रुपये प्रतिक्विंटल, असे होते. या बैठकीनंतर केळी दरात काहीशी सुधारणा झाली. परंतु मागील पाच ते सहा दिवसांपासून केळी दरांबाबत पुन्हा तक्रारी येत आहेत. परवाना नसलेले खरेदीदार केळीची थेट खरेदी करून वाहतूक करीत आहेत. केळीला जाहीर दरांपेक्षा कमी दर आहेत, अशा तक्रारी शेतकरी करीत आहेत.

Banana
Banana Farming Management : सिंचन, खत व्यवस्थापनावर भर

सध्या केळीचे दर १००० ते १२०० रुपये प्रतिक्विंटल, असे जाहीर केले जात आहेत. परंतु खरेदी ६०० ते ७०० रुपये प्रतिक्विंटल या दरात केली जात आहे. अनेक खरेदीदार विनवण्या करूनही केळीची काढणी लांबणीवर टाकतात. यात शेतात पक्व केळी खराब होण्याची, केळी झाडे मोडून पडण्याची भीती असते. यामुळे या अडचणीचा गैरफायदा खरेदीदार घेत आहेत.

केळीची आवक अधिक आहे, अशी बतावणी करून केळीची कमी दरात खरेदी सुरूच आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून, खरेदीदार, व्यापारी एकवटले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com