Banana Market
Banana MarketAgrowon

Banana Price: खानदेशात केळी दरात स्थिरता; कमाल दर २७०० रुपये

Khandesh Banana Market: खानदेशात केळी दरात मध्यंतरी पडझड झाली होती. पण आता दरात सुधारणा झाली असून, दर स्थिर आहेत. कमाल दर २७०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत आहेत.
Published on

Jalgaon News: खानदेशात केळी दरात मध्यंतरी पडझड झाली होती. पण आता दरात सुधारणा झाली असून, दर स्थिर आहेत. कमाल दर २७०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत आहेत. केळीची आवकही घटत आहे. किमान दर १४०० रुपये आहेत. सरासरी दर २२०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचले आहेत. आवक मात्र कमी होत आहे.

केळीची आवक खानदेशात सध्या १८० ट्रक (एक ट्रक १६ टन क्षमता एवढी आहे. मार्च महिन्यात प्रतिदिन सरासरी २८० ट्रक केळीची आवक होत होती. त्यात मागील काही दिवसांत घट झाली आहे. मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथेही सध्या ११० ते १०५ ट्रक केळीची आवक होत आहे. मागील हंगामात कुकुंबर मॉझॅक विषाणूच्या (सीएमव्ही) भीतीने अनेकांनी एप्रिल व मे महिन्यांत केळी लागवड केली होती.

Banana Market
Banana Crop Damage : केळीच्या नुकसानीचे पंचनामे गतीने करा

एप्रिल व मे महिन्यांत लागवड केलेल्या केळी बागांमधील काढणी मे महिन्याच्या मध्यापर्यंत वेगात सुरू होती. केळीची आवक मोठी व मागणी कमी, अशी स्थिती झाली होती. यामुळे एप्रिलमध्ये केळीदर ४०० ते ७०० रुपये प्रतिक्विंटल, असे होते. केळी दरात घसरणीमुळे जिल्हा प्रशासनाला हस्तक्षेप करावा लागला होता.

Banana Market
Banana Rate: खानदेशात केळीचा दर २९०० रुपये प्रति क्विंटल पोहोचला

व्यापाऱ्यांना तंबी द्यावी लागली होती. यंदा मात्र केळी दर मार्चपासून स्थिर आहेत. मार्च महिन्यात केळीला सरासरी १८०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. एप्रिल महिन्यात केळी दरात सुधारणा झाली.

आता कमाल दर मध्य प्रदेशातील बाजारात २७०० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. खानदेशात केळीची थेट किंवा शिवार खरेदी केली जाते. यामुळे शिवार खरेदीत केळीला कमाल २७०० ते २७५० रुपये प्रतिक्विंटलचा दर खानदेशात आहे. किमान दर १४०० रुपये प्रतिक्विंटल, असा आहे. केळीची पाठवणूक उत्तर भारतात केली जात आहे. दिल्ली, काश्मिरात पाठवणुकीच्या केळीचे दर २८०० रुपयांपर्यंत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com