Banana Rate: खानदेशात केळीचा दर २९०० रुपये प्रति क्विंटल पोहोचला

Khandesh Banana Market: खानदेशात केळीची कमी आवक आणि मागणी वाढल्यामुळे दर सुमारे २९०० रुपये प्रति क्विंटलवर पोहोचले आहेत.
Banana
Banana Agrowon
Published on
Updated on

Jalgaon News: खानदेशात केळीची कमाल दरपातळी मागील तीन-चार दिवसांत गतीने वधारून २९०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचली आहे. किमान दर १४०० रुपयांपर्यंत आहेत. केळी आवकेत मोठी घट खानदेशसह मध्य प्रदेशात झाली आहे.

उत्तरेकडील बाजारात गुजरात, मध्य प्रदेशातून केळीची पाठवणूक कमी झाली आहे. खानदेशातील केळीला उठाव वाढला असून, बाजारात पोकळी तयार झाली आहे. दुसरीकडे केळी आवकेतही घट दिसत आहे. यामुळे मागील आठ ते १० दिवसांत केळीचे कमाल दर १९०० रुपयांवरून २९०० रुपये प्रतिक्विंटलपर्य़ंत पोहोचले आहेत.

Banana
Banana Seedlings: केळीचे सात कोटी रोपे उपलब्ध होणार

मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूरच्या बाजारात गुरुवारी (ता.१५) केळीची १२९ ट्रक (एक ट्रक आठ ते १६ टन क्षमता) आवक झाली. तेथे केळीस कमाल २९६२ रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. तसेच किमान दर १४०१ रुपये प्रतिक्विंटल, असा होता. बऱ्हाणपुरातील दरानुसार खानदेशात केळीची शिवार किंवा थेट खरेदी केली जाते.

Banana
Banana Price Drop: खानदेशातील बाजारात व्यापाऱ्यांनी पाडले केळीचे दर

याच दरानुसार खानदेशात केळीची शिवार खरेदी सुरू आहे. दर्जेदार, निर्यातक्षम केळीचे दर २९०० रुपये प्रतिक्विंटल, असे आहेत. कमी दर्जाच्या केळीस १२००, १४०० रुपये प्रतिक्विंटलचे दर आहेत. सरासरी दरपातळी २३०० रुपये प्रतिक्विंटल अशी आहे. केळीची आवक खानदेशात मागील आठ ते १० दिवसांत कमी झाली असून, सध्या प्रतिदिन सरासरी २७५ ट्रक (एक ट्रक १६ टन क्षमता) केळीची आवक होत आहे.

मागील पंधरवड्यात किंवा एप्रिलच्या अखेरीस खानदेशात प्रतिदिन सरासरी ३५० ट्रकपेक्षा अधिकची केळी आवक होती. जळगाव जिल्ह्यातील रावेर, यावल, मुक्ताईनगर, चोपडा, जामनेर, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारातील शहादा, तळोदा व अक्कलकुवा भागांत केळीची आवक अधिक आहे. केळी आवक पुढील महिन्यात आणखी कमी होईल, असेही दिसत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com