Banana Disease : या लक्षणांवरुन ओळखा केळीतील करपा रोग

Team Agrowon

बारीक पिवळसर लांबट गोल ठिपके

रोगाचा प्रादुर्भाव प्रथम झाडाच्या जमिनीलगतच्या जुन्या पानांवर दिसून येतो. सुरुवातीस पानांच्या शेंड्यावर आणि कडांवर पानांच्या शिरांवर समांतर बारीक पिवळसर लांबट गोल ठिपके दिसून येतात.

Banana Disease | Agrowon

मोठे काळपट ठिपके

हे ठिपके कालांतराने एकमेकांत मिसळून आकाराने मोठे दिसू लागतात. हे ठिपके वाळल्यानंतर त्यांचा रंग तपकिरी काळपट होऊन मध्यभागी राखाडी होतो.

Banana Disease | Agrowon

प्रकाश संश्‍लेषण क्रियेत अडथळा

कालांतराने हा रोग झाडाच्या वरच्या पानांवर देखील पसरतो. याचा प्रकाश संश्‍लेषण क्रियेत अडथळा येतो.

Banana Disease | Agrowon

पाने करपतात

रोगास अनुकूल हवामान दीर्घकाळ टिकून राहिल्यास पाने टोकाकडून करपण्यास (वाळण्यास) सुरुवात होते.

Banana Disease | Agrowon

झाडाची वाढ खुंटते

रोगग्रस्त पाने करपून नंतर फाटतात. पाने झाडांवरच देठापासून मोडून लोंबकळतात. कालांतराने संपूर्ण पान सुकते. झाडाची वाढ खुंटते, परंतु झाड मरत नाही.

Banana Disease | Agrowon

केळीमध्ये गर भरत नाहीत

रोगाच्या तीव्र प्रादुर्भावात घडातील केळीमध्ये गर भरत नाहीत. फळे अपरिपक्व असताना अकाली पिकतात आणि घडातून गळू लागतात. अशा फळांचा गर पिवळसर होतो. अशी फळे चवीला तुरट लागतात.

Banana Disease | agrowon

घडाच्या गुणवत्तेवर व उत्पादनावर परिणाम

प्रकाश संश्‍लेषण क्रियेत अडथळा आल्याने आणि कार्यक्षम पानांची संख्या कमी झाल्याने घडाच्या गुणवत्तेवर व उत्पादनावर विपरीत परिणाम होतो.

Banana Disease | Agrowon
Sangamneri Goat | Agrowon