Tur Market : अकोल्यात तुरीचा सरासरी दर १० हजार रुपयांवर टिकून

Tur Rate : तुरीचे नवीन पीक यायला अद्याप दीड ते दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे.
Tur Market
Tur MarketAgrowon
Published on
Updated on

Akola News : तुरीचे नवीन पीक यायला अद्याप दीड ते दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. बाजारात सध्या विक्रीला येत असलेल्या तुरीला सरासरी १० हजार २०० रुपयांचा दर मिळत आहे. आवक १०० पोत्यांपर्यंत होत आहे.

अकोला येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या महिन्यात तुरीच्या सरासरी दरात ७०० ते ८०० रुपयांपर्यंत घट आल्याचे दिसून येत आहे. ४ नोव्हेंबरला येथील बाजार समितीत तुरीला उच्चांकी १२ हजार ३२५ रुपये प्रतिक्विंटलचा दर होता. किमान दर ९ हजार ५०० रुपये इतका मिळाला होता.

Tur Market
Mozambique Tur : तूर पाठवा नाहीतर करार रद्द करू; भारताचा मोझांबिकला इशारा

त्यानंतर दिवाळीच्या आधी बाजार सुरू असताना म्हणजेच ९ नोव्हेंबर रोजी तूर किमान १० हजार व कमाल ११ हजार ८१५ रुपये दराने विक्री झाली. त्यादिवशी सरासरी १० हजार ५०० रुपयांचा दर होता. नंतर दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे बाजार बंद होता. त्यानंतर १६ नोव्हेंबरला तूर सरासरी १० हजार ५०० रुपयांनी विक्री झाली.

तुरीचा किमान दर ८००० रुपये तर कमाल ११ हजार ६०० रुपये झाला. सरासरी दर १० हजार ५०० रुपये मिळत होता. आता पाच दिवसांनी म्हणजेच मंगळवारी (ता. २१) तूर किमान ९००० रुपये तर कमाल ११ हजार १०० रुपयांनी विक्री झाली. सरासरी १० हजार २०५ रुपये दर होता.

Tur Market
Tur Crop : पाण्याअभावी कोरडवाहू तुरीची स्थिती बिकट

तुरीचे उत्पादन काहीसे घटणार

व्यापारी सूत्रांच्या म्हणण्यानुसार देशात कर्नाटकची तूर डिसेंबरमध्ये विक्रीला येईल. त्यानंतर बाजारपेठेतील दरामध्ये चढ-उतार स्पष्ट होईल. राज्यातील तूर काही ठिकाणी डिसेंबरच्या शेवटी तर सरासरी जानेवारी-फेब्रुवारीत विक्रीला येईल.

यंदा तुरीचे उत्पादन कमी राहण्याची शक्यता आहे. तरीही फारसा फरक सध्या दिसून येत नाही, असेही सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे राज्यातील तुरीच्या दरावर किती परिणाम होईल, हंगामात निश्‍चित दर काय राहू शकतात, यासाठी थोडी प्रतीक्षा करावी लागेल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com